ऐन परीक्षेच्या काळातच वाचनालयाची बत्ती गुल कढोली (खुर्द) येथिल प्रकार; ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

54
ऐन परीक्षेच्या काळातच वाचनालयाची बत्ती गुल कढोली (खुर्द) येथिल प्रकार; ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

ऐन परीक्षेच्या काळातच वाचनालयाची बत्ती गुल

कढोली (खुर्द) येथिल प्रकार; ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

ऐन परीक्षेच्या काळातच वाचनालयाची बत्ती गुल कढोली (खुर्द) येथिल प्रकार; ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :कढोली (खुर्द) येथिल गोर – गरीब विद्यार्थ्यांना सायंकाळी अभ्यास करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून शासनाने वाचनालय बनवून ग्राम पंचायतीच्या स्वाधीन केले. दिवसभर शाळा झाल्यानंतर सायंकाळी टपरीवर वेळ घालविणारे विद्यार्थी वाचनालयात जाऊन अभ्यास करीत होते. मात्र मागील दोन महिन्यापासून ग्राम पंचायतीने या वाचनालयाचे इलेक्ट्रिक बील न भरल्याने संबंधित विभागाने वाचनालयातील मीटर काढून नेल्याने दोन महिन्यापासून हे वाचनालय बंद असून १० वी १२ वी ची परीक्षा तोंडावर आली असताना विद्यार्थ्यांना वाचनालयात अभ्यास करण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप कढोली येथिल प्रेमसागर बोंडे यांनी ग्राम सेवक यांना निवेदन देत वाचनालयातील खंडित वीज पुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे.

गावातील वाचनाची आवड असणाऱ्यांना वाचनालयात वाचन करता यावे, शालेय विधार्थाना अभ्यासाची ओढ लागावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या दृष्टीने शासनाने कोरपना तालुक्यातील कढोली (खुर्द) या गावात वाचनालय तयार केले असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालाची आहे. याबाबत ग्राम पंचायत कार्यालयाने हमीपत्र जिल्हा परिषदला दिले आहे. परंतु ग्रामपंचायतच्या चुकीच्या कारभार मुळे वाचनालयचे विद्युत बिल न भरल्यामुळे संबंधित विभगने मीटर काढून नेल्यामुळे दोन महिन्या पासून वाचनालयात अंधार आहे. यासंबंधी ग्राम पंचायतीला वारंवार सांगून सुध्दा दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वाचनालय बंद अस्वस्थेत धुळ खात आहे. या ठिकाणी अभ्यास करणारे विद्यार्थी हे गरीब घरचे, ज्यांच्या घरी अभ्यास करण्यासाठी पूरक वातावरण नाही, दिवसभर काम करणारे विद्यार्थी रात्रीला वाचनालयात जाऊन निवांत अभ्यास करीत असतात. परंतु मागील दोन महिन्यापासून इलेक्ट्रिक बील न भरल्यामुळे शालेय विधार्थाना व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत असल्याचे बोंडे यांनी सांगितले.

अगदी परीक्षेच्या तोंडावर वाचनालय बंद असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्याच्या एक तारखेपासून सुरू होणाऱ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित रहावे लागत आहे. छोट्या घरात अभ्यास करण्यासाठी जागा नसणे, घरी लहान मुलांचा आवाज, टिव्ही चा आवाज यापासून पर्यायी व्यवस्था म्हणून विद्यार्थी वाचनालयात जाऊन अभ्यास करीत होते. मात्र ग्राम पंचायतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार न करता वाचनालय बंद ठेवल्याने यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे घेणं देणं नसल्याचे प्रेमसागर बोंडे यांनी निवेदन देत वाचनालयातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी केली असून मागणीची दखल न घेतल्यास शालेय विद्यार्थी व गावकरी यांचा उपस्थित पंचायत समिती कोरपना समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

: मी वीस दिवसापूर्वीच या ग्राम पंचायत मध्ये रुजू झाले असून आर्थिक कारणामुळे वीज बिल भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. पण आठ दहा दिवसात वीज बील भरून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करणार आहे. तसे लाईनमन सोबत बोलणे झाले आहे.

:- वर्षा चौधरी, ग्रामसेवक कढोली (खुर्द)