भाजप कडून राम भक्तांना अयोध्या वारी.. चलो अयोध्याचा नारा.
✍️ संतोष उध्दरकर✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा : – अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर साकारल्यानंतर प्रत्येकाला या मंदिराला भेट देऊन श्री रामाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुका भाजपाच्या वतीने म्हसळा तालुक्यातून भाविकांना विशेष रेल्वे बोगीने अयोध्याकडे पाठवण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे,
पनवेल मधुन रात्री ९ वा ४५ मि. ही विशेष रेल्वे पनवेल रेल्वे स्थानकातून रवाना होणार आहे, यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,सियावर रामचंद्र की जय जय,जय श्रीराम अशा घोषणांनी रेल्वे स्थानक दुमदुमून जाणार आहे, अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर भाविकांना श्री राम लल्ला चे दर्शन घ्यायचे आहे मात्र सध्या प्रचंड गर्दी आहे, भक्तांना अयोध्या मध्ये येऊन प्रभु श्री रामचंद्र यांचे दर्शन घडावे हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपाने राम भक्तांना अयोध्या वारी घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हसळा तालुक्यातुन विविध भागातील अनेक भाविकांना अयोध्येला नेण्यात येणार आहे व रायगड मधुन सुमारे दोन हजार भाविकांची अयोध्या वारी घडणार आहे असे भाजप म्हसळा शहर अध्यक्ष प्रसन्न निजामपूरकर यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर,दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील,महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर भाविकांना निरोप देताना उपस्थित राहणार आहेत. हे भाविक १५फेब्रुवारी रोजी रात्री ९.४५वाजेच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानक मधुन आस्था अयोध्या या विषेश बोगीने अयोध्येला निघणार असुन अयोध्येला पोहोचल्यावर दिवसभर अयोध्येत विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवण्यात येईल.