कुणबी सेवा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित रायगड जिल्हा – माणगांव तालुका कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न
सांस्कृतिक कार्यक्रम हळदीकुंकू समारंभ आणि मार्गदर्शन शिबीरास समाजबांधवांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ नंदकुमार चांदोरकर ✒️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : कुणबी सेवा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित माणगांव – रायगड आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा व स्वागत समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यासह मुंबईमधून सांस्कृतिक हळदीकुंकू समारंभ आणि मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. यावेळी या कार्यक्रमास कुणबी समाज नेते अनिल नवगणे,माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुकाशाखा अध्यक्ष महेंद्र टिंगरे, कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ठोंबरे, सचिव अजय पाटील, उदय कठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली हा कार्यक्रम कुणबी युवा मंच अध्यक्ष निलेश तळवटकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजनकरुन उपस्थित मान्यवरांचे ट्रस्ट च्या वतीने शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ घेऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नागांव सरपंच यशवंत कासरेकर, ग्रामीण ट्रस्ट अध्यक्ष संतोष खाडे, समाजसेवक साहिल अम्बर्ले, माणगाव शाखा उपाध्यक्ष राकेश तुपट, रुग्णसेवक मोगरे, नितीन चाळके, समाजसेविका लता मॅडम, कांदिवली विधानसभा महिला संघटक सुवर्णा गोठवले, समाजसेवक विजय शिंदे , ऍड गोसावी, क्राईम ब्रँच ऑफिसर रुपेश साळवी, बाविशी विभाग अध्यक्ष राजू धोंडगे, वाशी शाखा प्रमुख मोहन भोस्तेकर, विजय बक्कम, प्रमोद बक्कम, विलास बक्कम, अशोक दसवंते तसेच ट्रस्ट महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा मोरे सह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा मोरे यांनी मार्गदर्शनात म्हटले की, पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे हळदीकुंकू आणि त्याचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया महिला मंडळाच्या सोहळ्यात सांगितले. त्यांनी मनोगतात वेक्त करताना महिलांना च्या भावना आवर्जून व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या कि महिला आपल घर नोकरी मुलबाळ सांभाळून आशा अनेक समस्यांना दिवसरात्र तोंड देऊन आपली कसरत करत संसाराचा गाडा पेलताना बरेचदा तिला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी वर्षातून एकदा तरी येणारी हळदीकुंकू कार्यक्रम विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणार ठरत ,घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे. तसेच खांद्याला खांदा देऊन काम करणारे माझे सहकारी सर्व ट्रस्टचे विश्वस्त, सदस्य, सभासद आणि समाज बंधू भगिनी. आज याठिकाणी सर्व वरिष्ठ आदरणीय समाज बांधवांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच यावेळी व्यावसायिक मार्गदर्शन असं अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. आपण सर्वांनी कुणबी सेवा चॅरीटेबल ट्रस्ट वर दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम कधीही विसरता येणार नाही .असे नेहमीच सहकार्य आम्हाला मिळत राहो. अशी अपेक्षा वेक्तकेल्या. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कुणबी युवा मंच मुंबई माणगांव या सर्व सभासद व महिला सभासद यांनी विषेश प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन कासरेकर तर प्रास्ताविक अध्यक्ष निलेश सत्वे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार पंकज पालकर यांनी मानले