हरविलेले 8 भ्रमणध्वनी पोलिसांनी काढले शोधून
• भ्रमणध्वनी त्यांच्या मूळ मालकांस केले परत
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
तळोधी (बा.) : 15 फेब्रुवारी
नागभीड तालुक्यातील तळोधी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गावांतील 8 भ्रमणध्वनी धारकांच्या हरविलेल्या भ्रमणध्वनीचा शोध लागला असून, हे भ्रमणध्वनी त्यांना परत दिल्याची माहिती तळोधी पोलिसांनी गुरुवार, 15 फेब्रुवारी रोजी दिली.
तळोधी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या काही गावांतील नागरिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी हरविल्याची तक्रार तळोधी पोलिस ठाण्यामध्ये केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार सायबर सेल चंद्रपूर यांच्याकडून तांत्रिक माहिती घेऊन चोरीला गेलेले 8 भ्रमणध्वनी शोधून काढण्यात तळोधी पोलिसांना यश आले. यामध्ये जफ्रून निसा (तळोधी), नरेंद्र मानकर (तळोधी), स्वाती गंजेवार (वाढोणा), गुरूदास गोपाले (तळोधी), कृष्णदास कानझोडे, प्रफुल बारसागडे, सुधाकर भानारकर, निकेश राऊत यांचा समावेश आहे. हे भ्रमणध्वनी उप विभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे व तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या उपस्थितीत मूळ भ्रमणध्वनी धारकांना परत करण्यात आले. याबद्दल या सर्वांनी पोलिस विभागाचे आभार मानले आहे.