शिवजयंतीनिमित्त घुग्गुस येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन
• छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे आयोजन
🖋️ साहिल सैय्यद
घुग्गुस तालुका प्रतिनिधी
📱93079 48197
घुग्गुस : 16 फेब्रुवारी
येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती असून, यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, घुग्घुस तर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भव्य मिरवणूक सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातून निघणार आहे. ही मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बहादे प्लॉट असे मार्गक्रमण करत निघेल. या मिरवणुकीस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इमरान खान तसेच समस्त संस्थाचालकांतर्फे करण्यात आले आहे.