संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त तुळजाभवानी गौरक्षण पोहरादेवीच्या वतिने शिबीरात ४४७ गोवंशांचे मोफत उपचार
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
वाशीम : दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी क्रांतिकारी शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त बांपुचा ठेवा जोपासणाऱ्या आणि बिमार, अपघातामुळे अपंगत्व,म्हातार्या,व भक्कड गोवंशाचे आश्रयस्थान बनलेल्या तुळजाभवानी जीवदया गौरक्षणाच्या वतिने आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पशुरोग निदान आणि औषधोपचार मोफत भव्य अभिनव शिबीर संपन्न झाले.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संतोषजी राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला पुष्पमाला अर्पित करुन गोपुजन केले, संस्थान चे अध्यक्ष शेषरावजी जाधव यांनी भोग लावून पुजा विधी केली तर श्री पांडुरंग महाराज यांनी अरदास करुन , प्रसादाचे वितरण उपस्थित गावकऱ्यांना केलीत.सकाळी ९ ते ४ वाजेपर्यत उपाशी पशु राहूनये म्हणुन गोभक्त आणि पशु चारणार्या लोकांचे यांच्या मतानुसार बाकीचे सर्व कार्यक्रम स्थगित करुन जंगलात पोहरादेवी ते पंचाळा फाटा येथील सामाजिक वनीकरण च्या नर्सरीत पाच गावातील बिमार पशुंचे रोग निदान करुन ४४७ गोवंशाचे उपचार करण्यात आलेत.पशुरोगचिकीस्तक डॉ प्रेमदास राठोड यांनी सर्वाची मदत मदत घेवून ताप,सर्दि,पोटफुगी,जंत,गोचिड चे औषध बीमार पशुंना पाजले तसेच उंड्यात दिले.अशक्त पशुंना ताकदिची इंजेक्शन दिलीत.त्यापैकी सिरीअस गोवंशाला गौरक्षणात सतत तिन दिवस उपचार करणार असून प्लास्टिक खालेल्या ११ पशूंचे आॉपरेशन करण्यात येणार आहे.सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या तुळजाभवानी जीवदया गौरक्षण संस्थान वसंतनगर च्या सौजन्याने अबोल आजारी पशुंना ढेप,गुळ चा ओंडा खाऊ घालण्यात आले.श्री शेषरावजी जाधव,संतोषजी राठोड अकोला,देविसींग राठोड ,व्यकटेश चव्हाण, बालाजी जाधव,साहेबराव जाधव, अरविंद आडे, कचरु पाटील, राजु म्हसने, विकास पाटील,ईत्यादी लोकांनी मेहनत केली.