सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

54
सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 17 फेब्रुवारी
सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित येथील सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची थाटात सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर हे होते, तर यावेळी सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.चंद्रकांत खैरवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुवर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अजय बेले, कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रा. विकी पेटकर, सांस्कृतिक विभागप्रमुख सुमेधा श्रीरामे यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयातील महोत्सवांमध्ये नृत्य, गायन यासह विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याप्रसंगी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. वरिष्ठ विभागात बेस्ट फॅकल्टी अवॉर्ड युजीआर्टला तर कनिष्ठ विभाग मध्ये बेस्ट फॅकल्टी अवॉर्ड विज्ञान शाखेला देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संचालन डॉ. सपना वेगिनवार, तर आभार डॉ. अजय बेले यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर,सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणा तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त महोत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या.