नेरळ येथे फेक्सीबल रिफ्लेक्टिव पोलचा पाहिला प्रयोग; सुयोग पाटील वाहतूक निरिक्षक

59
नेरळ येथे फेक्सीबल रिफ्लेक्टिव पोलचा पाहिला प्रयोग; सुयोग पाटील वाहतूक निरिक्षक

नेरळ येथे फेक्सीबल रिफ्लेक्टिव पोलचा पाहिला प्रयोग; सुयोग पाटील वाहतूक निरिक्षक

नेरळ येथे फेक्सीबल रिफ्लेक्टिव पोलचा पाहिला प्रयोग; सुयोग पाटील वाहतूक निरिक्षक

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०११११९९३३३

नेरळ :- कर्जत – बदलापूर रस्त्यावर नेरळ जवळ, जय जलाराम रेस्टॉरंट समोर अचानक रस्ता रुंद/अरुंद होतो.

नेरळ कडून कर्जत कडे जात असताना रस्त्यावर हलकासा उतार आहे व अगोदर रस्ता अरुंद आहे. व तेथे अचानक रस्ता रुंद होतो व तेथून अत्यंत कमी उंचीचा दुभाजक आहे.
व जेथून दुभाजक सुरू होतो तेथेच किंचित डावे वळण आहे जे वाहन चालकांच्या लक्षात येत नाही.
अगोदर हलकासा उतार असल्याने वाहने वेगात असतात व तो दुभाजक व ते किंचित वळण लक्षात न आल्याने वाहने सरळ जाऊन दुभाजकावर चढतात व अपघात होतात. रात्रीच्या वेळी परिस्थिती अजून गंभीर होते.
याठिकाणी असे अनेक अपघात झालेले आहेत.
पण कित्येक छोटे मोठे अपघात पोलीस दप्तरी नोंद होत नाहीत.

सदर ठिकाणी असलेले अनेक खांब , जाहिरातीचे खांब इत्यादी अपघातांमध्ये नष्ट झाले आहेत पण त्यांच्या खुणा अजूनही तेथे आहेत.
सदरचे ठिकाण Vulnerable ठिकाण आहे.

अपघातांची ऊर्जा शोषली जावी म्हणून वाहनांमध्ये क्रंपल झोन बनवलेले असतात.

सदर ठिकाणचे खांब रिजिड असल्याने अपघातात ते नष्ट होत होते व अपघात पण गंभीर होत होते.

वरील सर्व बाबींचा खोलवर विचार करता सदर ठिकाणी वाहन चालकांच्या लक्षात येण्यासाठी परावर्तकीय व अपघात झाल्यास त्याची ऊर्जा शोषण्याकरिता लवचिक स्वरूपाचे खांब उभे करण्याची बाब निम्नस्वाक्षरीत यांच्या विराराधीन होती.

दिनांक १४.०२.२४ रोजी निम्नस्वाक्षरीत श्री सुयोग पाटील, समोवानि, प्रा प का, पनवेल व जय मल्हार रिक्षा संघटना, नेरळ यांच्यावतीने ,
सदर ठिकाणी Flexible reflective पोल
उभे करण्यात आले आहेत. कदाचित हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा.