रजपे येथे विवाहित महिलेची आत्महत्या
ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा माहेरच्यांचा दावा
✒️रुपेश महागवकर
खलापुर रायगड प्रतिनिधी
📞93731 57184
कर्जत :- कर्जत तालुक्यातील रजपे येथिल मयत अश्विनी संतोष घूडे वय २७ वर्ष शनिवार दिनांक १७ रोजीच्या सकाळी झाडाला स्वतः च्याच साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. डॉक्टरांकडे नेल्यानंतर तीला मृत घोषित करण्यात आले. ही बातमी समजताच मु. विडे ता.मुरबाड येथिल माहेरच्या नातेवाईकांनी धाव घेत कर्जत पोलीस स्टेशन गाठल्यानंतर सासरी असलेला छळ आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे तिने माहेरी कळविले असल्याने तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगितले.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मयत अश्विनी हीचा २०१८ साली विवाह झाला असून तिला पाच आणि तीन वर्षाची दोन मुले आहेत. मयत अश्विनी रजपे येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत होती. सासरी छळ होत असून तिला ठार मारू शकतात अशी कल्पना तिने याआधीच माहेरी दिली असल्याची माहिती भाऊ देवेश मंगल शिंगळे यांनी दिली आहे.
दरम्यान या संदर्भात पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५/२०२४ नुसार आरोपी संतोष घुडे यांच्या आणि आणखी तिघांविरोधत भा. द. वी. कलम ४९८/अ,३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सय्यद करीत आहेत.