कठडे नसलेल्या विहिरीत पडून अस्वलाचा मृत्यू

56
कठडे नसलेल्या विहिरीत पडून अस्वलाचा मृत्यू

कठडे नसलेल्या विहिरीत पडून अस्वलाचा मृत्यू

कठडे नसलेल्या विहिरीत पडून अस्वलाचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चिमूर : 19 फेब्रुवारी
शेतशिवारातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून नर अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 19 रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगावजवळील वघाळपेठ येथे घडली. मृत अस्वल 2 वर्षाची असावी, असा अंदाज वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
जंगलव्याप्त भागापासून युवराज सिताराम गुरपुडे यांचे शेत असून, या शेतात कठडे नसलेली विहिर आहे. अस्वल शेतामध्ये बोरं खाण्यासाठी आली असावी. चुकून ती विहिरीत पडल्याचा अंदाज वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी शेतकरी शेतात गेले असता, त्यांना विहिरीत अस्वल मृत्यूमुखी पडून असल्याची बाब लक्षात आली. त्याने लगेच याबाबतची माहिती वनाधिकार्‍यांना दिली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाने विहिरीबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण, विहिरीत पाणी जास्त असून, बाहेर निघण्यासाठी कुठलाही आधार न मिळाल्याने तिचा बुडून मृत्यू झाला असावा, असेही वनाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. विहिरीत गळ टाकून मृत अस्वलाला बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पंचनामा केला. सिंदेवाही पशुवैद्यकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृत अस्वलाला अग्नी देण्यात आले.
घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी के. बी. देऊरकर, क्षेत्र सहाय्यक संतोष औतकर, यु. बी. लोखंडे, वनपाल आर. डी. नैताम, विशाल सोनुने, राहुल भुरले, कालीदास गायकवाड, अक्षय मेश्राम, तरूण पर्यावरण मंडळाचे अमोद गौरकार आदींनी भेट दिली.