छत्रपती शिवरायांच्या जयंतीला घडले एकतेचे दर्शन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
कोरपना/गडचांदूर
सर्व धर्म समभाव ही संकल्पना भारतातील धर्मनिरपेक्षतेच्या मुख्य तत्त्वांपैकी एक आहे आणि याचीच प्रचीती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. 4 च्या हिंदु मुस्लिम सिख ईसाई सगळ्या धर्माच्या मित्रांनी मिळून
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी_महाराज यांच्या जयंतनिमित्त आली. सर्व प्रभागवसियानी मिळून श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ज्याच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराज भिनले असतील तो माणूस जातीपातीचा विचार कधीच करू शकत नाही. आमचा राजा कोण होता? काय होता? अजूनही आम्ही त्यांचं नाव का घेतो? हे त्या गडकिल्ल्यांवर गेल्यावर कळतं. आज तुमची आमची ओळख कोणामुळे आहे? कोण तुम्ही आम्ही? महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे कोण? मराठी, मराठी म्हणजे कोण? आम्ही शिवछत्रपतींच्या भूमीतले… अशीच प्रचीती कोरपना आणि गडचांदूर येथे आली.
यावेळी शंकर गाते, महेश ससाणे, सोनू गुरनुले, गौरव पथाडे, अक्षय गाऊतरे, गौरव मेश्राम, सावर पथाडे, उमेश मोहितकर, बादल केवट, अरबाज शेख, गौरव गावतुरे, आकाश गावतुरे, हरीश गावतुरे, लांचा मोहितकर, रोहित नागराळे, राजू मेश्राम, गुरुदेव केवट, दिपक पारखी, शंकर शेंडे, संतोष वाठोरे, अमोल वाघमारे, बादल रॉय, सूरज टेकाम, अंकुर मुनेश्वर, अलीम शेक, आसिफ शेख, आशिक शेख, शाहबाझ शेख, योगेश यवले, वाहीद शेख, आकाश गुरणुले, चंदन मल्लिक, तेजस करंडेकर, विनायक शेंडे आदींची उपस्थिती होती.