अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

59
अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

ज्ञानेश्वर तुपसुंदर
प्रतिनिधी नाशिक तालुका
मो. 8668413946

दि: 20 ( नाशिक ) अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी आज पोलीस ठाण्यात स्वत:च्या सर्विस रिवाल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आज सकाळी नेहमी प्रमाणे अशोक नजन हे साडेनऊ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले. पोलीस स्टेशनच्या बाहेर हजेरी लावण्यासाठी पोलीस बाहेर उभे होते. मात्र अशोक नजन हे बाहेर नसल्याचे दिसताच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या केबिनमध्ये गेले मात्र त्यांना अशोक नजन हे मृत अवस्थेत दिसले.

या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजूू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली.

पोलीस निरीक्षक अशोक नजन हे मूळचे वैजापूर तालुक्यातील बेळगाव येथील असून ते सदया नाशिक येथे अंबड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.