छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसतर्फे शहरात भव्य आकर्षक मिरवणुक जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषाणे शहर दुमदुमले

53
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसतर्फे शहरात भव्य आकर्षक मिरवणुक जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषाणे शहर दुमदुमले

छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसतर्फे शहरात भव्य आकर्षक मिरवणुक

जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषाणे शहर दुमदुमले

छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसतर्फे शहरात भव्य आकर्षक मिरवणुक जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषाणे शहर दुमदुमले

🖋️ साहिल सैय्यद….

घुग्घुस तालुका प्रतिनिधि

📲 9307948197

घुग्घुस :येथील छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी शहरात भव्य आकर्षक मिरवणूक काढून शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी युवकांनी एकच जल्लोष केला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाणे शहर दुमदुमुन गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसतर्फे १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार व घुग्घुसचे प्रभारी ठाणेदार प्रशांत साखरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माल्यार्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, काँग्रेस नेते रोशन पचारे, प्रशांत सारोकर, एआयएमआयएमचे सानु सिद्दीकी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली आठवडी बाजार, गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत बहादे प्लॉट येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आले.

मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था घुग्घुसचे अध्यक्ष इमरान खान, उपाध्यक्ष प्रीतम भोंगळे, सचिव स्वप्नील वाढई, सहसचिव सुचित सोदारी, कोषाध्यक्ष नागेश तुराणकर, राम मेंढे, मुन्ना लोडे, पराग आकुलवार, महेश कैथल, मोहन घोटे, गफार शेख, मोहन जगताप, मंगेश हिरादेवे, शाहरुख शेख, निलेश भोंगळे, समिप गाटले, मनोज वाडीवा, मयुर कलवल, सारंग पीदुरकर, निखिल कामतवार, सुरज मोरपाका, किशोर जोगी, सादिक शेख, आशिक शेख, महेश हंसकार, आकाश बेस, अमन लिपटे यांनी प्रयत्न केले.