अंगणवाडी चिराठी व चिराठी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ३९४ वी शिवजयंती उत्साहात साजरी

59

✍️ संतोष उध्दरकर✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- म्हसळा तालुक्यातील चिराठी या दुर्गम भागातील ग्रामस्थ व अंगणवाडी चिराठी यांच्या संयुक्त विद्यमाने ३९४ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी लहान लहान चिमुकल्यांनी जय भवानी…जय शिवाजी..हर हर महादेव या जयघोषांनी चिराठी गाव दुमदुमून निघाले, सर्व प्रथम अंगणवाडी सेविका सानिका उध्दरकर, मदतनीस प्रमिला चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच चिराठी ग्रामस्थ व नवतरुणांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन केले, सेविका सानिका उध्दरकर यांनी शिवजयंती निमित्ताने लहान मुलांना उत्तम मार्गदर्शन केले, शिवाजी महाराज कसे घडले या बद्दल थोडक्यात माहिती दिली व शिवाजी महाराज यांच्या जिवनकथेवर पोवाडा सादर करून ग्रामस्थ व पालक यांची मने जिंकली, लहान चिमुकले पारंपरिक वेषभुषेत सुंदर दिसत होती,त्यांनी देखील शिवाजी महाराज यांच्या जीवनावर गाणे सादर केले तसेच लाठी काठी, तलवार बाजी सादरीकरण करून दाखविले, त्यानंतर गावातुन शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने शिवमिरवणुक काढण्यात आली, या मध्ये अध्यक्ष संतोष मांडवकर,विद्यमान नगरसेवक सुनील शेडगे, माजी नगरसेविका शितल मांडवकर, माजी अध्यक्ष गोविंद नाचरे, अंगणवाडी सेविका सानिका उध्दरकर, मदतनीस प्रमिला चव्हाण,लक्ष्मण मांडवकर, महादेव मोरे, सहदेव मांडवकर, अक्षय मांडवकर, किसन मोहिते,जिगर अलिम, मिनल चव्हाण, विद्या वाले, प्रिती मोरे, पायल कांदेकर, आरती चव्हाण,व सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ सहभागी झाले होते.