बारावी च्या बोर्डाची परीक्षा येथे सुरु अशीच प्रगती घडो,
विद्यार्थ्यांसाठी एचएलईएस संस्थेची दारे सदैव खुली : अध्यक्ष हाजी लियाकत सय्यद
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत तालुका प्रतिनिधी
📞9011199333📞
नेरळ : – नेरळ येथील हाजी लियाकत इंग्रजी उच्च माधामिक शाळा व कॉलेजमध्ये उडान ५ चे स्नेह संमेलन दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाले. ह्या वर्षी पासून बारावी बोर्ड परीक्षा येथे सुरु झाली अशीच प्रगती घडो विशेष श्रेय अब्दुल सर व त्यांच्या संपूर्ण स्टाफ यांना देत आहे. आर्थिक कारणाने शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या शाळेची दारे सदैव खुली असतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष हाजी लियाकत हनीफ सय्यद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. या संस्थेच्या बेबी एंजल हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि हाजी लियाकत सीबीएसई स्कूल चे वार्षिक समारंभात ते बोलत होते.
नेरळ कर्जत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हाजी लियाकत इंग्लिश हायस्कूलचे प्रांगणात उड्डाण-५ या वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता. या स्नेह संमेलनामध्ये एच.एल.ई.एस. संस्थेच्या बेबी एंजल, हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि हाजी लियाकत सी.बी.एस.ई. स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी लियाकत हनीफ सय्यद, अंजुमन इस्लामिक कॉलेज मुंबई प्रॉपर्टी बोर्ड चे चेअरमन रंगूनवाला, अवामी कॉलेज बांद्रा चे प्रिन्सिपल अलनास जकारिया, संस्थेचे उपाध्यक्ष दाऊद सय्यद शाळेचे सचिव अब्दुल रहमान सय्यद, मुख्याध्यापिका शशिकला परदेशी, प्रशासकीय प्रमुख नुरी मुकादम, आदी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला, कार्टून काढणे, उत्कृष्ट हस्तक्षर, ग्रीटिंग कार्ड बनविण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. त्यात २७ यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जिया शिंदे, श्रीशांक पवार, अरबाज खान यांनी प्रथम क्रमांक मिळविले आहेत. या शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रिय पातळीवरील ऑलिम्पियाड मध्ये सहभागी झाले होते. त्या स्पर्धेतील जीके, सायन्स, इंग्लिश आणि गणित ऑलिम्पियाड मध्ये सुवर्ण पदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात पार्श्व जैन, अनुराग शिंग्रा, आशना नजे, उडन राजकोटवाला, कुरूनाझी पत्रावाला, एब्रहिम सहेड, आफिया शेख, शारमा शेख, इशाना जयस्वाल, कस्तुरी, इशिका कोळंबे, कस्तुरी कुंभार, अर्णव जाधव आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, त्यात बेबी एंजल शाळेच्या चिमुरड्यांना स्वागत गितापासून सुरुवात केली. या विद्यार्थ्यांचे सात सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले, तर हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि हाजी लियाकत सी.बी.एस.ई. मधील विद्यार्थ्यांनी १७ कार्यक्रमांचे सादरीकरण केले. त्यातील मोबाईलचे दोष या सादरीकरणाने पालक वर्गाची वाहवा मिळविली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख उमेआयमन राजकोटवाला, मिलिंद जोशी, गणेश सोनावणे यांनी केले.