“शासन आपल्या दारी” हा उपक्रम तालुकास्तरावर वारंवार राबविण्यात यावा-आमदारअदिती तटकरे
✍️किशोर पितळे:✍️
तला तालुका प्रतिनिधी
📞९०२८५५८५२९ 📞
तला :-माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी” हा उपक्रम सुरू झाला असून त्याला सर्वलोकप्रतिनिधींनी भरभरून संमती दिली त्यामुळे राज्यात राबवले जात आहे त्यामागे भूमिका अशी आहे की शासकीय काम सहा महिने थांब अशी आपण साधारणपणे प्रचलित शासकीय म्हण तयार झाली होती ही कुठेतरी थांबून एक नव्याने शासनाचे लाभ तळागाळापर्यंत लाभार्थ्या पर्यंत पोहोचले जावेत एकच छत्राखाली उपलब्धकरता यावे यासाठी शासनाने ‘विविध योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे मी प्रशासनाला म्हणेन की दर महिना असेच कार्यक्रम घेऊन लाभ उपलब्ध करून द्यावे असे महिला बालकल्याण मंत्री आमदार अदिती तटकरे यांनी यावेळी आवाहनकेलेपुढेम्हणाल्याकि राज्याचेउपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसउपमुख्यमंत्रीअजित दादा पवार असतील व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतीलआमच्या सगळ्यांचे हाच प्रयत्नआहे की लाभार्थ्यांना एकत्र योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला पाहिजे आज बाहेर स्टॉल लावलेले आहेत त्यामध्ये आधार कार्ड लिंक, आभा कार्ड, संजय गांधी निराधार योजना, लेक लाडकी योजना,कृषी विभागाचे योजना एकत्र कधी उपलब्ध करून देतो जेणे करून या कामासाठी दहा वेळा ग्रामीण भागातून खेपा मारायला लागू नये हा उद्देश आहे जवळपास श्रीवर्धन मतदार संघात ४० हजाराहून अधिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे त्यामध्ये श्रीवर्धन प्रथम तालुका आहे पुढील वेळेस तळा तालुक्याचा पहिला क्रमांक यायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करावेत असे सर्व विभागाच्याअधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे आवाहन केले .
यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी संदिपान सानप,तहसीलदार स्वातीपाटील बि.डी.ओ.कुलदिप बोंगे नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे माजी जिल्हा परिषद सदस्य गीता ताई जाधव जिल्हा महीला युवती अध्यक्षा सायली दळवी तालुका अध्यक्ष नाना भौड नगरसेवक नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचायत समिती विभाग३१ महसुली विभाग९१, प्रा.आरोग्य केंद्र २०एकात्मिक बालकल्याण विभाग८ बँक ऑफ इंडिया १८,स्टेट बँक ऑफ इंडिया१०, तालुका कृषी विभाग२६ नगरपंचायत३०महावितरण५ अशा विविध विभागातील जवळपास२३९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये महिला बालकल्याण विभागा कडून नवजात बालकांचे स्वागत व आरोग्य किट वाटप करण्यात आले.जातप्रमाणपत्र,मृत्युदाखले, रमाई घरकुल,टाॅवर टिलर,शेत तळे,प्रमाणपत्र धनादेश वाटप आमदार अदिती तटकरे व उपस्थीतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विभागातील कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन पाटील सर यांनी केले.