उमरेड एमआयडीसी मध्ये टायर कंपन्यामुळे उमरेड वासियांना स्वास गुदमरतो व दमा , टि.बी.सारख्या असंख्य अन्य रोगास आमंत्रण

116
उमरेड एमआयडीसी मध्ये टायर कंपन्यामुळे उमरेड वासियांना स्वास गुदमरतो व दमा , टि.बी.सारख्या असंख्य अन्य रोगास आमंत्रण

उमरेड एमआयडीसी मध्ये टायर कंपन्यामुळे उमरेड वासियांना स्वास गुदमरतो व दमा , टि.बी.सारख्या असंख्य अन्य रोगास आमंत्रण

उमरेड एमआयडीसी मध्ये टायर कंपन्यामुळे उमरेड वासियांना स्वास गुदमरतो व दमा , टि.बी.सारख्या असंख्य अन्य रोगास आमंत्रण

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो
9096817953

उमरेड. उमरेड तालुक्यामध्ये गिट्टीचे केशर 200 च्या वर असून कोळसा खदानी चार आहे. रोज 200 ट्रकची ये_जा चालू असते. यामुळे उमरेड चे पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले आहे. त्यामध्ये आणखी आठ टायर कंपन्यांची भर पडलेली आहे. टायर उघड्यावर जाळत असल्यामुळे होणारे धुराचे प्रदूषण व दुर्घटनामुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे उमरेड करांना श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. दररोज होणाऱ्या या प्रकरणामुळे नागरिक वारंवार प्रशासनास रोगधाम करण्याबाबत विनंती करीत आहे.परंतु टायर कंपनीच्या मालकाकडून होत असलेली विशेष कृपेमुळे व स्थानिक आमदार व खासदार यांच्या प्रभावाखाली दबलेली प्रशासन यंत्रना उपाययोजना करण्यास तयार नाही. या टायर कंपन्यांच्या मुजोरीला येसन घालने गरजेचे झाले आहे. एमआयडीसी कडून आठ टायर कंपन्या असून टायरापासून तेल व तार काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात जुने टायर जाळले जातात. परंतु जाडण्या करिता चिमणीचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून निघणारा धूर आजूबाजूला न पसरता आकाशात निघून जाईल.उघड्यावर टायर जाळतात. सायंकाळ झाली की हा कार्यक्रम सुरू होता. यातून निघणारे दुर्गंध व धुराचे लोट वातावरणात मिसळतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरून श्वास घेणे कठीण होते नागपूर, भिवापूर,गिरड ,मोहपा , आधी मार्गावर असलेले बायपास चौक परसोडी , भिसी नाका परिसरापर्यंत धूर व दुर्गंधीचा त्रास जाणवतो. वातावरणात मिसळणाऱ्या धुरामुळे रात्रीच्या वेळी श्वास घेणे कठीण होत आहे. आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहे. घरे , रस्ते ,वृक्ष ,वाहने याच्यावर धुरांची काजळी जमा असते. टायरच्या धुरा मुळे निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या. कायमस्वरूपी दूर व्हावी या साठी मागील दोन वर्षापासून नागरिकांनी तक्रार केलेल्या आहेत. मात्र तात्पूर्ती मलमपट्टी काढण्यापुढे त्यांच्याकडून कोणतेही उपाय योजना करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व रोग व्यक्त होत आहे हा प्रकार बंद न झाल्यास उमरेड पोलीस स्टेशनमध्ये कंपन्या मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल अन्यथा शिवसेना तर्फे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडल्यास यास शासन व प्रशासन जिम्मेदार राहील. असे आव्हान शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांना सांगण्यात आले.