वर्धा जिल्ह्यात दलालांकडून निराधारांची आर्थिक लुट.
मुकेश चौधरी
वर्धा:- जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात दलालाचा सुळसुळाट झाला असून हिंगणघाट, देवळी, पुलगाव, कारंजा, वर्धा, आर्वी तालुकास्तरावरील प्रत्येक कार्यालयात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी दलालांला मोठ्या प्रमाणात रक्कम दयावी लागत असल्याने या दलालाकडून निराधार लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. शासनाच्या निवृत्तीवेतन व निराधार वेतन यासह इतर योजनांचा लाभ घेण्याकरिता गावातील तलाठ्यांनी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे अपेक्षित आहे, पंरतू गावपातळीवरील काम करणारे तलाठी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास असमर्थतता दाखवित असल्याने निराधार व्यक्तींना तहसील कार्यालयात येऊन योजनेच्या लाभासाठी तहसीलचे उंबरठे झिजवून सुध्दा प्रकरणावर मंजुरात मिळत नाही या उलट तहसील कार्यालयात असलेल्या दलालाला आर्थिक रक्कäम दिल्यानंतर त्या प्रकरणाला ताबडतोब मंजुरात मिळते. काही तहसील कार्यालयातील कर्मचारी प्रत्यक्ष लाभार्थ्यांचे काम न करता दलालाकडून आलेल्या कामाला प्रथम प्राधान्य देत आहे. त्यामुळे या योजनांच्या कार्यालयात दलालाच्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तसेच या योजनेसाठी लागणारा आरोग्य अधिकार्यांचा दाखला सुध्दा पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. या सर्व प्रकारामुळे लाभार्थ्यांचे आर्थिक पिळवूणक होत असल्याचे दिसून येते. वर्धा