व्हि. बी. गंद्रे गॅस एजेंसी माध्यमातून घुम रुद्रवट ग्रामपंचायत मध्ये गॅस सुरक्षितता मार्गदर्शन शिबीर.

59
व्हि. बी. गंद्रे गॅस एजेंसी माध्यमातून घुम रुद्रवट ग्रामपंचायत मध्ये गॅस सुरक्षितता मार्गदर्शन शिबीर.

व्हि. बी. गंद्रे गॅस एजेंसी माध्यमातून घुम रुद्रवट ग्रामपंचायत मध्ये गॅस सुरक्षितता मार्गदर्शन शिबीर.

व्हि. बी. गंद्रे गॅस एजेंसी माध्यमातून घुम रुद्रवट ग्रामपंचायत मध्ये गॅस सुरक्षितता मार्गदर्शन शिबीर.
✍️ संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- म्हसळा तालुक्यातील मौजे घुम रुद्रवट या गावात व्ही बी गंद्रे एच पी गॅस एजेन्सी दिवेआगर यांच्या माध्यमातून व घुम रुद्रवट ग्रामपंचायत वतीने सक्षम महिला ग्रामपंचायत सरपंच महिला अंतर्गत गॅस मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात एजेंसी वतीने मान्यवरांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी दिप्ती गंद्रे मॅडम यांनी ग्रामस्थ यांना गॅस सिलेंडर कशा पद्धतीने वापरण्यात यायला पाहिजे व गॅस सिलेंडर सुरक्षितता बाबतीत तसेच गॅस बचतीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन केले, तसेच बाहेरील फेरीवाले यांच्या कडून गॅस शेगडी घेऊ नये अथवा दुरुस्ती करून घेऊ नये, शक्यतो अधिकृत वितरक यांच्या कडूनच शेगडी घेणे अथवा दुरुस्ती करून घेणे या बाबतीत देखील ग्रामस्थ यांना सुचना दिल्या व जर का गॅस गळती होत असेल तर गॅस सिलेंडर रेग्युलेटर बंद करून लगेच वितरक यांना कळविणे या बाबतीत देखील सौ गंद्रे यांनी सांगितले, यावेळी गावातील वयोवृद्ध महिलांना रेग्युलेटर गॅस सिलेंडरला कशा पद्धतीने लावायचे या बाबतीत प्रशिक्षण देखील देण्यात आले. उज्वला योजने मधुन कुणाला गॅस कनेक्शन हवे असल्यास गंद्रे गॅस एजेंसीला संपर्क करावे व प्रत्येक घरात गॅस सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे असे उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर यांच्या कडून ग्रामस्थांना सांगण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हसळा व्यवस्थापक संतोष उध्दरकर यांनी केले तर आभार गावचे सचिव प्रसाद महागावकर यांनी मांडले, या शिबिरात एच पी गॅस चे मालक समीर गंद्रे, सौ दिप्ती गंद्रे, ग्रामपंचायत सरपंच सौ साक्षी घोले, उपसरपंच व पत्रकार श्रीकांत बिरवाडकर,घुम महिला अध्यक्ष श्रृती गायकर, रुद्रवट महिला अध्यक्ष चांदणी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा रटाटे, सदस्य प्राची शिगवण, सदस्य अनिता रिकामे, सदस्य मनस्वी गायकर, गावचे सचिव प्रसाद महागावकर, अंगणवाडी सेविका अक्षता बिरवाडकर, मदतनीस करुणा गायकर, अंगणवाडी सेविका रुद्रवट संजना बोर्ले,आशा सेविका प्रेरणा महागावकर सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.