भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सर्व संमतीने कांग्रेस आघाडीचा उमेदवार ठरणार.. संयमी,शांत आणि अभ्यासू असणार काँग्रेसचा उमेदवार..!

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सर्व संमतीने कांग्रेस आघाडीचा उमेदवार ठरणार..

संयमी,शांत आणि अभ्यासू असणार काँग्रेसचा उमेदवार..!

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सर्व संमतीने कांग्रेस आघाडीचा उमेदवार ठरणार.. संयमी,शांत आणि अभ्यासू असणार काँग्रेसचा उमेदवार..!

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं. 9373472847📞

भंडारा : मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गांधी भवन कार्यालयात प्रांताध्यक्ष सन्मानिय नाना भाऊ पटोले यांची भेट घेतली. सुरु असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, लोकसभेच्या जागावाटपाबाबत आघाडीच्या मित्र पक्षांसह बैठक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता यांच्यासी भेट व संवाद,अशा अतिशय व्यस्त असलेल्या वेळातून वेळ काढून नाना भाऊंनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल या बाबतीत सविस्तर चर्चा केली. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आघाडीच्या सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, लोक संमती मिळवून उमेदवाराची प्रतिमा लोकाभिमुख करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे व त्या दिशेने कार्य प्रारंभ करण्याचे आदेश दिले.
प्रांताध्यक्ष नाना भाऊंच्या निर्देशानुसार भंडारा गोंदिया मतदार संघाचे प्रभारी,कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश बाबू चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक समिती गठीत करण्यात आली. त्यात सहप्रभारी म्हणून माझ्या समवेत डॉ. अजय तुमसरे,भरत खंडाईत आणि रमेश कुमार पटले यांच्या समावेश करण्यात आला आहे.
मतदारांना कांग्रेस आघाडीचा उमेदवार कोण अशी उत्सुकता असतांना नाना भाऊंनी पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांसी सल्लामसलत करून संभाव्य उमेदवार अतिशय संयमी,शांत,सर्वांच्या विश्वासाचं आणि अभ्यासू असा सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व असलेला राहील असे सांगितले. बंद लिफाप्यात दडलेलं उमेदवाराचा नाव,त्याचा चेहरा रेखाटत भाऊंनी गुलदस्त्यात असलेल्या नावाचा सुतोवाच दिलं असलं तरी नाव जाहीर होईपर्यंत सर्वांना उत्सुकता राहील याची काळजी घ्यावी, अशी सूचना नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.