म्हसळा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सर्व पक्षीय पदाधिकारी यांची भेट देऊन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले
✒️ नंदकुमार चांदोरकर ✒️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : म्हसळा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट देऊन अदिती ताईंना निवेदन दिले जल जीवन कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली तसेच तहसीलकार्यालयातील घोळही निदर्शनास आणून दिला व आयोजकानाचा निषेध करून महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांचं स्वागत केल. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सरकारी असून सर्व सामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने राबवायचा आहे.पण म्हसळा तहसीलदार यांनी सदर कार्यक्रमच शहराच्या हद्दी बाहेर आयोजित करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून जनतेची पिळवणूक केली. शासन आपल्या दारी पेक्षा लोकांची शासना दारी गैरसोई दिसून आल्या. या कार्यक्रमात भूमी अभिलेख यांचा समावेश पण दिसून आला नाही त्या मुळे भूमी अभिलेख कार्यलय शासनाचा आहे की खाजगी या वर पण विचार करायची वेळ आली आहे. या शासकीय कार्यक्रमात सर्व पक्षीय पदाधिकारीना आमंत्रण करणे गरजेचं होत पण तस केल गेलं नसल्याने आयोजक दबावाखाली काम करत आहेत का अशी राजकीय चर्चा होत आहे. निवेदन देताना भाजप युवा मोर्चाचे निलेश मांडडकर मनसे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगांवकर भाजप शहर अध्यक्ष प्रसन्न निजामपुरकर शिवसेना शिंदे गट उप तालुका अध्यक्ष अक्रम साने मनसे उप शहर अध्यक्ष राहुल काते शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख निहाल पेणकर उपस्थित होते.