सत्यनारायण कथेला फाटा देत ‘ग्रामगीता’ वाचनाने केले वास्तुपूजन लोनगाडगे कुटुंबीयांच्या परिवर्तनीय कार्याची सर्वत्र चर्चा

सत्यनारायण कथेला फाटा देत 'ग्रामगीता' वाचनाने केले वास्तुपूजन लोनगाडगे कुटुंबीयांच्या परिवर्तनीय कार्याची सर्वत्र चर्चा

सत्यनारायण कथेला फाटा देत ‘ग्रामगीता’ वाचनाने केले वास्तुपूजन

लोनगाडगे कुटुंबीयांच्या परिवर्तनीय कार्याची सर्वत्र चर्चा

सत्यनारायण कथेला फाटा देत 'ग्रामगीता' वाचनाने केले वास्तुपूजन लोनगाडगे कुटुंबीयांच्या परिवर्तनीय कार्याची सर्वत्र चर्चा

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजुरा : 2 मार्च
तालुक्यातील कढोली (बु).गावातील कविता व महादेव लोनगाडगे,सुकन्या अश्विनी व सुपुत्र प्रतिक लोनगाडगे या लोनगाडगे कुटुंबीयांनी त्यांचे नविन वास्तुपूजन “गृहप्रवेश” निमित्त सत्यनारायण कथेला फाटा देत गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात केली,नविन वास्तुत “श्रीगुरुदेव अधिष्ठाणाची”, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व दिवंगत वडील तुळशीराम लोनगाडगे यांच्या प्रतिमेची स्थापणा केली याप्रसंगी श्री.सुधाकर झाडे यांनी ग्रामगीता ग्रंथाचे वाचन केले व भजनांचा कार्यक्रम झाला त्यामुळे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचाराचा प्रसार झाला, त्यांचे स्तुत्य व परिवर्तनवादी उपक्रमा बद्दल अनेकांनी महादेव लोनगाडगे कुटुंबीयांचे कौतुक केले. याप्रसंगी लक्ष्मनराव गमे सर्वाधिकारी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, सौ.मालाताई गमे, अभिजीत गमे, सौ.सारिका गमे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिमा व ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रिय सदस्य, ॲड.सारीका, सुपुत्री प्रगती,सुपुत्र चैतन्य जेनेकर यांनी “श्रीगुरुदेव साहित्य” भेट दिले. यावेळी देवराव कोंडेकर,सौ.मालु कोंडेकर ऊर्जानगर, किशोर झाडे प्रचारक,नातेवाईक,आप्तेष्ट गावकरी मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती .