कल्याणमधील बँक ऑफ बडोदाची शाखा जळून खाक.
अस्मिता सपकाळ
कल्याण:- मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला शुक्रवारी भीषण आग लागली. रात्री 9 वाजता लागलेली आग एक तास धुमसत होती. आगीत बँकेतील सर्व दस्तऐवज जळून खाक झाले.
कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोड वरील काटेमनिवली परिसरात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शाखेच्या खिडक्या फुटून रात्री 9 वाजता धुराचे लोट बाहेर आल्याने एकच धावपळ उडाली.
नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलास आगीची माहिती दिली. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.