माणगाव तालुका स्तरीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : दि ०३/०३/२०२४ रोजी माणगाव येथे सामाजिक क्रांतीचे प्रणेते थोर समाजसुधारक महापुरुष आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंती माणगाव तालुका संत रोहिदास विकास मंडळ. संत रोहिदास महाराज समाज मंदिर माणगाव येथे संपन्न झाली.
मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी आणि समाजातील सर्व समाज बांधव आणि भगिनी यांच्या प्रचंड उपस्थितीत महाराजांची जयंती उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली.
संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे माणगाव तालुका समाजातील सर्व समाज बांधव, युवा वर्ग व महिला भगिनी यांच्या समवेत मंडळाचे संस्थापक कमिटीतील प्रतिनिधी कृष्णा गोरेगावकर सर यांच्या हस्ते प्रथम दिप प्रज्वन करून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सूत्र संचालनाची धुरा संत रोहिदास विकास मंडळाचे सचिव राजेश इवलेकर सर यांनी अगदी शेवट पर्यंत सांभाळली. प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी संतोषजी पुगावकर यांची निवड करण्यात आली, व संघटक अनिल महाडिक यांनी अनुमोदन केले.
कार्यक्रमास आलेल्या सर्व बांधवांचे स्वागत करून आभार मानण्यात आले. अध्यक्ष संतोष पुगावकर यांनी प्रस्तावना केली.
विलासजी गोरेगावकर सर (मुंबई), यांना संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी संत रोहिदासांच्या जीवनावर आपले बहुमूल्य विचार व्यक्त करून समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले, तसेच नारायण चांदोरकर सर, (साई उसर्) , कोंडविलकर सर (पळसगाव) यांनी सुध्दा समाज बांधवांस् संत रविदास महाराजांविषयी इतिहास निदर्शनास आणून दिला.
तसेच २०२३-२४ मधे १०वी, १२वी पास.विद्यार्थी गुणगौरव सोहळा,२०२३-२४ सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रिय, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या तसेच वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व समाजाप्रती उत्तम कामगिरी केलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील स्पर्धकांना भेटवस्तू पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. महिला मंडळ यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्या क्षणी रोहिदास विकास मंडळ माणगाव तालुका अध्यक्ष संतोषजी पुगावकर , उपाध्यक्ष गणेशजी गोरेगावकर, संतोषजी पाटनुसकर, सचिव राजेशजी इवलेकर, सहसचिव नितेशजी पुरारकर, खजिनदार अशोकजी चांदोरकर, सहखजिनदार शशिकांतजी श्रीवर्धनकर, सदस्य सुनीता पाबरेकर, संघटक अनिलजी महाडिक, मारुती पाबरेकर, माजी उपाध्यक्ष भारतजी चांदोरकर, माजी सचिव संतोषजी पाबरेकर , माजी सहसचिव दत्ताराम मोर्बेकर,भगवानजी पाबरेकर, राष्ट्रीय महासंघ सम्पर्क प्रमुख महेशजी गोरेगावकर, मंगेशजी पुरारकर, प्रशांतजी श्रीवर्धनकर, अनिलजी गोरेगावकर, योगेश चांदोरकर सर,दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे मंदार चांदोरकर तसेच रोहीदास विकास मंडळाचे, पत्रकार नंदकुमार चांदोरकर, पत्रकार परशुराम आंबेतकर, सल्लागार भीमजी आंबेतकर, तसेच माणगाव तालुक्यातील २८ गावांतील पदाधिकारी, सर्व सभासद बंधू आणि महीला मंडळ तसेच युवा वर्ग बहु संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे माणगाव तालुका कार्यकारिणी, तालुक्यातील सर्व सभासद बंधू ,स्थानिक मंडळाचे काही सभासद, महीला मंडळ, यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, रोहीदास विकास मंडळ माणगाव तालुक्यातील काही सभासदांनी देणगी स्वरूपामध्ये मदतीचा हात दिला.
सचिव इवलेकर सर यांनी उपस्थित सदस्य, मान्यवर यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली