ग्राम पंचायत येथे सतत वेळेवर येत नसल्यामुळे “त्या” ग्रामसेवकाला त्वरित निलंबित करावे, नागरिकांची मागणी
अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही :- तालुक्यातील मिनघरी, अंतरगाव आणि नाचन भट्टी येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार असलेले ग्रामसेवक श्री संदीप घोणमोडे यांच्या कामकाजाबाबत नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे. श्री संदीप घोणमोडे ग्रामपंचायत कार्यालयात कधीही त्या वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची सतत गैरसोय होते. आले तर कार्यालयत १० मिनिटे बसतात व फोनही घेत नाहीत. ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याने गावाचा विकास खुंटला असून, विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले मिळत नाही.
ग्रामपंचायत स्तरावरील कामकामात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्यालयीन वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने आखून दिले आहे. या वेळापत्रकानुसार हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे. असे असूनही ग्रामसेवक श्री संदीप घोणमोडे त्यावेळेनुसार कार्यालयत येत नाही. तालुक्यात ४९ ग्रामपंचायती आहेत. काही ग्रामसेवकांकडे एका तर काहींकडे दोन, तीन ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कधी व कोणत्या वेळी उपस्थित राहतील, याबाबत संबंधित गावातील नागरिक अनभिज्ञ असतात. अनेकठिकाणी ग्रामसेवकांच्या शोधात नागरिकांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. मंगळवार , बुधवार, गुरुवार शुक्रवार या चार दिवशी संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांना सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले. परंतु श्री संदीप घोणमोडे ग्रामसेवक हे वेळेवर येत नाहीत, सतत गैरहजर असतात त्यांना वेळीच निलंबित करावे अशी तिन्ही ग्राम पंचायत येथील नागरिकांची मागणी आहे.
कोट
*मी नाचन भट्टी येथील नागरिक असून ग्रामसेवक हे वेळेवर हजर नसतात. फोन केले तर फोनही घेत नाही. आम्हाला वेळेवर कुठलेच दाखले मिळत नाही, अशा ग्राम सेवकाला वेळीच निलंबित करावे. – एक सुज्ञ नागरिक, नाचन भट्टी
कोट
*मी मिनघरी येथील नागरिक आहे. या ग्राम सेवकामुळे आम्ही फार वैतागलो आहे. कधीही वेळेवर हजर नसतात आणि कामाच्या वेळेस वेळकाढू पणा करतात. आज करतो. उदयाला करून देतो असे बोलतात. – एक सुशिक्षित नागरिक, मिनघरी
कोट
*मी वेळेवर येत नाही तरी सुद्धा मी तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवितो. एकाच रोडवर ग्राम पंचायत असल्यामुळे मी एकाच दिवशी कार्यालयात जाऊन दाखल्यावर सह्या करतो. – श्री संदीप घोणमोडे, ग्रामसेवक , मिनघरी, अंतरगाव आणि नाचन भट्टी