दि.2 ते दि.9 मार्च 2024 या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन

दि.2 ते दि.9 मार्च 2024 या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन

दि.2 ते दि.9 मार्च 2024 या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन

दि.2 ते दि.9 मार्च 2024 या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 89832 48048📞

माणगांव :-दि.03 मार्च या जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दि.2 मार्च ते 9 मार्च 2024 या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.या सप्ताहाचा शुभारंभ दि.02 मार्च 2024 रोजी अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शितल जोशी-घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मिश्रा, कान /नाक/ घसा तज्ञ डॉ. हर्ष गुजराथी व डॉ.हरिष आर.यांचे हस्ते संपन्न झाला .दि.04 मार्च 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांची कर्णबधिरता जनजागृती रॅली काढण्यात आली. या सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी श्रवण, वाचा,कान,नाक,घसा तपासणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण व श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले.हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट ऋषिकेश देशमुख व स्पीच थेरपिस्ट समाधान चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.