जाणता राजा’ महानाट्य प्रयोग 10 ते 12 मार्च दरम्यान आयोजन

जाणता राजा' महानाट्य प्रयोग 10 ते 12 मार्च दरम्यान आयोजन

जाणता राजा’ महानाट्य प्रयोग 10 ते 12 मार्च दरम्यान आयोजन

जाणता राजा' महानाट्य प्रयोग 10 ते 12 मार्च दरम्यान आयोजन

✍️नितेश पुरारकर ✍️
लोणेरे गोरेगाव विभाग
📞 70211 58460📞

माणगांव -सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन
10 ते 12 मार्च 2024 या कालावधीत कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी,पनवेल येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चारित्र्याची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकीक वारशाला प्रसिद्धी मिळावी, तसेच त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत पोहचावे यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी, मान्यवर व नागरिक यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. या महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.