नेरळ पोलिसांकडून दोन जनावरांची सुटका… व १५० किलोचे मांस जप्त

नेरळ पोलिसांकडून दोन जनावरांची सुटका... व १५० किलोचे मांस जप्त

नेरळ पोलिसांकडून दोन जनावरांची सुटका… व १५० किलोचे मांस जप्त

नेरळ पोलिसांकडून दोन जनावरांची सुटका... व १५० किलोचे मांस जप्त

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३

नेरळ ; नेरळ पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोवांशिय जनावरे यांची कत्तल केली जात असल्याची खबर मिळाली. त्या खबरी नुसार नेरळ पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तब्बल गोवांशीय जनावरे यांचे १५० किलो मांस तसेच दोन लहान वयाची बैल आढलून आले. पोलिसांनी या कारवाईत दोघांना अटक केली असून नेरळ पोलिसांकडून सातत्याने गोवंशिय तस्करी आणि हत्या रोखण्यासाठी धाडी टाकण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.

दामत गावातील उमामा वसीम नजे आणि अब्दुल वसीम नजे यांच्या घरात आणि बेड्या मध्ये जनावरे तस्करी करून आणली आल्याची खबर नेरळ पोलीस यांना मिळाली होती. ८ मार्च रोजी पहाटे ही खबर मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे एक पथक हे दामत गावात पोहचले. पोलिसांवर शस्त्र सज्ज करून गेले होते. केलेल्या धाडी मध्ये उमामा नजे यांच्या घरामध्ये आणि बेड्या मध्ये दोन बैल कत्तली साठी आणून ठेवल्याचे तर एका बाजूला गोवशिय जनावरे यांचे तब्बल १५० किलो मांस आढळून आले. त्यावेळी त्या गोवांशिय मांसाचे वजन करीत असताना पोलिसांनी उमामा नजे आणि अब्दुल वसीम नजे या दोघांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी वजन काटा आणि जनावरे त्यांची कत्तल करण्यासाठी आणलेली लोखंडी खांडणी,तीन धारदार चाकू आणि लोखंडी सुरू देखील ताब्यात घेण्यात आला.या मुद्देमाल सह पांढऱ्या रंगाचा चार वर्षे वयाचा बैल तसेच तीन वर्षे वयाचा आखूड शिंगे असलेला बैल ताब्यात घेतले. ते सर्व मांस आणि साहित्य नेरळ पोलीस ठाणे येथे आणले. त्यानंतर पोलिसांनी कत्तली साठी आणलेल्या पर्यंती पोलीस छाप्यात सुटका झालेल्या दोन्ही बैलांना कोंभळ वाडी येथील गोशाळेत सुखरूप नेले.
नेरळ पोलीस ठाण्यात त्याबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ४२९,२३ नुसार तसेच भारतीय प्राणी संहिता सुधारणा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ ब चे उल्लंघन ९ (५) ब चे उल्लंघन चे ९अ सह प्राण्यांच्या क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करणारे अधिनियम १९६० चे कलम ११, १ ड प्रमाणे दामत गावातील उमामा वसीम नजे आणि अब्दुल वसीम नजे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शन खाली सहायक पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे आणि अन्य पोलिसांनी ही कारवाई केली.