पी एम सूर्यघर मोफत बिजली घर योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना जाहीर केली आहे. छतावर सौर ऊर्जा उभारणीद्वारे घरांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.दरमहा 300 यूनिट पर्यन्त मोफत वीज देऊन 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वीज निर्मितीसाठी रुफटॉप सोलरपैनल बसविण्यास येणार आहे. पात्र कुटुंबांना मोफत वीज मिळेल तसेच भरीव सबसीडी थेट लोकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. मोठ्या प्रमाणात सवलतीचे बँक कर्ज उपलब्ध होईल. सर्व भागदारकांना सोईसाठी राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल मध्ये एकत्रीत केले जाईल.घरांच्या छतावर सोलरपैनल बसवण्यासाठी सोलरपैनलच्या खर्चाच्या 40% पर्यन्त (78000) अनुदान दिले जाईल.पी एम सूर्यघर मोफत बिजली घर योजनेत सहभागी होण्यासाठी आणि नाव नोंदणी करण्यासाठी कृपया तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.