एकदा माझ्या हातात सत्ता द्या सगळे भोंगे बंद करतो – राज ठाकरे
ज्ञानेश्वर तुपसुंदर
तालुका प्रतिनिधी नाशिक
मो. 8668413946
नाशिक : एकदा माझ्या हातात सत्ता द्या सगळे भोंगे बंद करतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये भोंग्यांविषयी बोलल्यावर माझ्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या होत्या आणि ते स्वत:ला हिंदुत्ववादी सांगतात. तुमच्या सर्वांच्या कष्टाने एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो.” असे राज ठाकरे म्हणाले.
“आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १८ वर्षे पुर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरामध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही यावेळी ठरवलं आहे. राजकारणात राहायचं असेल तर त्यासाठी पेशन्स असावा लागतो. गेल्या १८ वर्षात मी अनेक चढउतार पहिले. या संपुर्ण चढउतारामध्ये तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहिलात. मी तुम्हाला यश मिळवून देणार म्हणजे देणार. पण त्यासाठी पेशन्स लागतो,” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही. बाहेरील राज्याचे लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची? जाती जातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे यांना नकोय. तुमच्यात विष कालविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या बाबतीत सोशल मीडियावर काही काही टाकलं जात आहे. गाडी येते, दरवाजा उघडतो, मी खाली उतरतो आणि मागे र रा रा रा रा चालू असतं. अरे काय आहे? यातून तुमच्या आणि माझ्या हाताला काय लागलं? काहीतरी आपल्या गाडी दाखवायच्या, लाईट दाखवायचे, माणसं उतरताना दाखवायचे, कोणीही ते पाहत नाही. तुम्ही पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर तुमचा कंटेट लोकांपर्यंत पाठवत असाल तर लोकं पाहत नाही. त्यातून त्यांना काही गोष्ट ऐकायला, पाहायला मिळणार असेल तरच लोकं ते पाहतात,” असेही ते म्हणाले.
आता कोणत्या पक्षाचे नाव घेतलं तर कोण सध्या कुठे आहेत हे विचारावे लागते. मागे एका कार्यक्रमात ५ नगरसेवक भेटले, ३ शरद पवार आणि २ अजित पवार गटाचे होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार राष्ट्रवादीचे दोन गट दिसत असले तरी माझी खात्री आहे ते दोघेही आतून एकच आहेत असे ठाकरे म्हणाले.