देवघर येथे स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी… भक्तिमय वातावरणात श्री अमृतेश्वर निघाले न्हाऊन.. ऊॅ नम:शिवाय मंत्राने अमृतेश्वर देवस्थान दुमदुमले.

देवघर येथे स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी... भक्तिमय वातावरणात श्री अमृतेश्वर निघाले न्हाऊन.. ऊॅ नम:शिवाय मंत्राने अमृतेश्वर देवस्थान दुमदुमले.

देवघर येथे स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी…

भक्तिमय वातावरणात श्री अमृतेश्वर निघाले न्हाऊन.. ऊॅ नम:शिवाय मंत्राने अमृतेश्वर देवस्थान दुमदुमले.

देवघर येथे स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी... भक्तिमय वातावरणात श्री अमृतेश्वर निघाले न्हाऊन.. ऊॅ नम:शिवाय मंत्राने अमृतेश्वर देवस्थान दुमदुमले.

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे देवघर ग्रामीण भागातील निसर्ग रम्य परिसरात वसलेले स्वयंभू श्री अमृतेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्रि निमित्ताने दर वर्षी प्रमाणे यंदा ही श्री दत्तात्रेय देव व श्री अमृतेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे, सकाळी स्वयंभू श्री अमृतेश्वरवर दुग्ध अभिषेक, नंतर महाआरती, संपूर्ण गावामधुन ग्रामस्थ यांच्या कडून दिंडी, दुपारी भजन,तसेच स्थानिक ग्रामस्थ भजन मंडळ यांचे दिवसभर सुस्वर भजन व किर्तन, असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच मंदिर आकर्षक रोषणाईने व फुलांनी सजविण्यात आले होते,
देवघर येथे स्वयंभू श्री अमृतेश्वर देवालय ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, सकाळ पासून भाविकांची स्वयंभू श्री अमृतेश्वराच्या दर्शनासाठी रागांच रांगा दिसत होत्या अगदी अलोट गर्दी पाहायला मिळत होती, भक्तिमय वातावरणात श्री अमृतेश्वर देवस्थान न्हाऊन निघाले होते तसेच ऊॅ नम शिवाय मंत्राने अवघे अमृतेश्वर देवस्थान दुमदुमून गेले होते. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्टच्या वतीने स्वयंसेवक नेमण्यात आले होते,तालुक्यातील अनेक भाविक, प्रतिष्ठित व्यक्ति व काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील श्री अमृतेश्वराचे दर्शन घेतले, या कार्यक्रमात श्री दत्तात्रेय देव व श्री अमृतेश्वर देवालय ट्रस्ट यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते, तसेच म्हसळा तालुका जेष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.