रविप्रभा मित्र संस्था ग्रामपातळीवर काम करते दर तीन महिन्यांनी असे शिबीर घ्यावे या साठी आमचे सहकार्य असेल. ..डॉ महेश मेहता.

रविप्रभा मित्र संस्था ग्रामपातळीवर काम करते दर तीन महिन्यांनी असे शिबीर घ्यावे या साठी आमचे सहकार्य असेल. ..डॉ महेश मेहता.

रविप्रभा मित्र संस्था ग्रामपातळीवर काम करते दर तीन महिन्यांनी असे शिबीर घ्यावे या साठी आमचे सहकार्य असेल. ..डॉ महेश मेहता.

रविप्रभा मित्र संस्था ग्रामपातळीवर काम करते दर तीन महिन्यांनी असे शिबीर घ्यावे या साठी आमचे सहकार्य असेल. ..डॉ महेश मेहता.

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:श्री रविप्रभा मित्र संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गृप ग्रामपंचायत घोणसे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे घोणसे वडाची वाडी येथे विविध रोग निदान शिबीर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते,यावेळी लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्ध यांची नेत्र तपासणी, मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, दमा, ह्रदय विकार,असे विविध आजारावर तपासणी करून काहींना लगेच औषधोपचार करण्यात आले. या शिबिराला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.घोणसे गृप ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थ,महिला,वयोवृध्द,लहान मुल,यांनी या शिबिराचा लाभ घेतला,या कार्यक्रम ठिकाणी बोलताना वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश मेहता यांनी सांगितले की रोगावर प्रतिबंधक उपाय केला तर रोगावर आपल्याला विजय मिळवता येतो त्यासाठी असे शिबीर घेणे आवश्यक आहे, आणि रविप्रभा मित्र संस्था ही गावपातळीवर काम करते दर तीन महिन्यांनी या प्रकारे शिबीर घ्यावे या साठी आमचे नक्कीच सहकार्य मिळेल तसेच गृप ग्रामपंचायत यांनी संस्थेच्या माध्यमातून व आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करून त्यांनी अतिशय उत्तम कार्य केले आहे असे देखील सांगितले. तसेच सहा पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी देखील रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक,आरोग्य,सामाजिक या विषयावर होत असलेल्या कामाचे कौतुक केले, या कार्यक्रमात वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश मेहता, सहा पोलीस निरीक्षक पवन चौधरी,संस्था अध्यक्ष रवींद्र लाड,सरपंच रमेश कानसे,माजी सरपंच राजु लाड,डाॅ,पवन यादव, डॉ फराह जलाल, डॉ भावना अर्बन, नेत्र तज्ञ डॉ राजिव गोईत, अश्विनी बुधकर,सानप,तसेच सर्व परिचारिका,आशाताई,अंगणवाडीसेविका,मदतनिस,जेष्ठ पत्रकार उदय कळस, प्रदिप कदम, सुरेश कुडेकर, अमित महामुणकर, सचिन महामुणकर, कौस्तुभ करडे, विशाल सायकर, रिमा महामुणकर,साक्षी महामुणकर, गाव अध्यक्ष सिताराम काते,पत्रकार नंदकुमार चांदोरकर,महाडिक गुरुजी, सोनवणे गुरुजी,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाडिक गुरुजी यांनी केले तर प्रस्थाविक सल्लागार संतोष उध्दरकर यांनी सादर केले व आभार गावचे अध्यक्ष सिताराम काते यांनी मांडले. गृप ग्रामपंचायत सरपंच रमेश कानसे यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत तसेच शिबिरात आलेल्या पाहुण्यांची व ग्रामस्थ यांची चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था देखील सरपंच रमेश कानसे यांच्या वतीने करण्यात आली होती.