चंद्रपूर, वणी, आर्णीतून राजेश बेले यांना उमेदवारी ? काय म्हणाले युवा नेते राजेश बेले….. 

93

लोकसभा निवडणूक 2024: राजेश बेले

मीडिया वार्ता वृत्तसेवा

मो: 8830857351

चंद्रपूर, 11 मार्च: कधीही लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता चंद्रपूर जिल्ह्यातले युवा नेतृत्व, नेहमी जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे नेते म्हणून राजेश बेले जिल्ह्यातच नव्हें तर विदर्भातही जनसामान्यांच्या ओठावरील एक सुपरिचित नाव आहे. अश्यातच बेले यांना चंद्रपूर, वणी , आर्णीतून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बेले यांच्या मते त्यांना भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षातर्फेही उमेदवारीची विचारणा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

बेले यांनी अद्याप कोणत्याही पक्षाबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. बेले हे चंद्रपूरमधील एक तरुण आणि तेली समाजातील लोकप्रिय नेते आहेत. चंद्रपूर मतदार संघातून यापूर्वी स्व. शांताराम पोटदुखे यांनी सहावेळा खासदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, त्यांच्या पश्चात तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. बेले यांना उमेदवारी मिळाल्यास, चंद्रपूर, वणी , आर्णी लोकसभा मतदारसंघात तेली समाजासह ओबीसी समाज त्याच्या पाठीशी उभा राहील असे बेले म्हणाले.