बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 11 मार्च
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्य सोमवार, ११ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता जागतिक महिला दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये महिला दिन पारंपारिक वेशभूषा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या प्रेरणास्त्रोत यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ममता बजाज व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भरत बजाज मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वोदय महिला मंडळ चंद्रपूर, प्राचार्य सतीश ठोंबरे, प्रा. वनिता हलकरे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर, तनुजा बोढाले सहा. शिक्षिका नूतन हायस्कूल, चंद्रपूर उपस्थित होते.
भरत बजाज यांनी आपल्या मनोगतातून आधुनिक काळातील स्त्रियांचे कार्य आणि प्रगती यावार प्रकाश टाकला, तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या ममता बजाज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून याहीपुढे जाऊन स्त्रियांना स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर आत्मनिर्भर बनून स्वताचे निर्णय स्वत घेण्यावर भर द्यावा लागेल असे आव्हान केले. यात विविध स्पर्धांमध्ये आनंद मेला, फॅन्सी ड्रेस, रस्सीखेच, चे आयोजन करण्यात आले, त्यात सर्व विभागातील महिला प्राध्यापिका, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी मानले. सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा नील सी. बजाज यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागातील महिला प्राध्यापिकांनी मोलाचे सहकार्य केले.