जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबीर संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबीर संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबीर संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबीर संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मूल : 11 मार्च
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भोजन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर आणि विविध महिला संघटना मुल यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजारांच्या बाबतीत विधान तसेच उपचार करण्यात आले. महिलांमधील रक्ताची कमतरता, पांढरे पाणी जाण्याचा त्रास, ओटीपोटातील दुखणे, मासिक पाळी संबंधातील त्रास किंवा इतर स्त्रीरोग विषयक आजारांचं निदान आणि उपचार करण्यात आले. यावेळी कॅन्सर निदानासाठी 18 महिलांचे पॅपस्मिअर नमुने घेण्यात आले तसेच अनेक पेशंटचे थायरॉईड तपासणीसाठी रक्त सुद्धा घेण्यात आले.
या कॅम्पचा तीनशेच्या वर लाभार्थी महिलांनी लाभ घेतला. या कॅम्प चे आयोजन बहुजन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कॅम्पला तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. स्त्री रोग तज्ञ डॉक्टर धनश्री शेंडे, डॉ. पूनम नगराळे,डॉ. शुभांगी वासाडे,डॉ.मनीषा शेंडे,डॉ. श्वेता टिपले,डॉ. प्रवीणा वराडे,फिजिशियन डॉ. राकेश वनकर,डॉ. दीपक जोगदंड,डॉ. राजू ताटेवर ,दंतचिकित्सक डॉ. आशिष कासटवर,डॉ.तीरथ उराडे तसेच एनसीडी स्टाफ तसेच कॅम्प मध्ये अनेक अशा संघटनांनी आपले सहकार्य दिले. त्यामध्ये उपस्थित महिला-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूरच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, ज्ञानज्योती, जिजाऊ सावित्री व लक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सीमा लोणबले, नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेच्या अध्यक्ष आशा नागोसे, रत्ना चौधरी, मीरा शेंडे. अलका राजमलवार,अखिल भारतीय महिला माळी महासंघाच्या अध्यक्ष शारदा शिंदे, संगीता ढोले,जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या कुसुम रणदिवे, जया ढवस, माधुरी दांडेकर, उषा चुधरी, माधुरी गुरनुले, शुभांगी शेंडे, किरण चौधरी, जिजाऊ सावित्री रमाई विचार मंचचे अध्यक्ष बबीता गडेकर, कांबडी मॅडम, अलका जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष संजीवनी वाघरे, कल्पना मेश्राम, प्रभा मडावी, वैशाली काळे, मारटकर, सुपनार, खोब्रागडे, सुजाता बर्डे आदींचे सहकार्य लाभले.