कळमेश्वर ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत, एकूण 78.96 टक्के मतदान

55

कळमेश्वर ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत, एकूण 78.96 टक्के मतदान

युवराज मेश्राम प्रतीनीधी

कळमेश्वर:- नागपुर जिल्ह्यातील एकुण 130 ग्रामपंचायत निवडणूकीपैकी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी, सोनेगाव, सेलु, सावंगी या 4 ग्रामपंचायती करीता मतदान शांतपणे पार पडले असुन सर्व उम्मेदवारांचे भवितव्य मतपेटीतून येणाऱ्या 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार

तालुक्यातील सोनेगाव,कोहळी,सावंगी,सेलू या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सर्वच पक्षासोबतच स्थानिक आघाड्यांनी आपआपले उम्मेदवार रिंगणात उतरवून भाग्य आजमावत आहेत.तालुक्यातील 4 ग्रामपंचायत मधील 37 जगेकरिता 78.96 टक्के मतदान झाले असून एकूण ६६१७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.यामधे 3217 महिला तर 3400 पुरुषांचा समावेश आहे.