वसुली पथकाद्वारे व्हिडिओ तयार करून शोसल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करा

पोलिस स्टेशन मोहाडी येथे केली तक्रार दाखल

गून्हा दाखल करण्याची पदमानंद गभने व नगर विकास संघर्ष समितीने केली मागणी

वसुली पथकाद्वारे व्हिडिओ तयार करून शोसल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करा पोलिस स्टेशन मोहाडी येथे केली तक्रार दाखल गून्हा दाखल करण्याची पदमानंद गभने व नगर विकास संघर्ष समितीने केली मागणी

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका नगर पंचायत येथे घर टॅक्स वाढीचा मुद्दा तापलेला असताना नगर पंचायत मोहाडी ने घर टॅक्स वसुली करीता विशेश पथक तयार करून जबरीने घर टॅक्स वसुली करताना दिसत आहे. सर्व नागरिक घर टॅक्स भरतातच यात दुमत नाही, पण वेळेवर कुणाकडे पैसे उपलब्ध नाही. तर काय करणार? अशीच घटणा दिनांक ७ मार्च २०२४ रोजी श्री परमानंद लक्ष्मण गभने यांचा किराणा दुकानात ५ ते ६ च्या संख्येने वसुली पथकवाले घर टॅक्स वसुली करीता आले. गभणे यांनी सध्या माझ्याकडे पैसे नाही. व ३१मार्च २०२४ च्या आधी मी घर टॅक्स भरतो असे सांगीतले. पण वसुली पथकाने गभणे यांना दमदाटी केली. व जप्तीची कार्यवाही करू असे सांगीतले. व त्या पथकातील एका इसमाने व्हिडिओ तयार करून शोसल मीडिया वर वायरल केला.

वसुली पथकाद्वारे व्हिडिओ तयार करून शोसल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करा पोलिस स्टेशन मोहाडी येथे केली तक्रार दाखल गून्हा दाखल करण्याची पदमानंद गभने व नगर विकास संघर्ष समितीने केली मागणी
करीता हेतुपुरस्परपणे गभने यांचा व्हिडिओ शोसल मीडियावर वायरल करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार परमानंद गभने यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला दिली. व असे बहुतांश लोकांचे व्हिडियो बनवून वायरल कऱण्यात आलेले आहेत. यांच्यावर कार्यवाही न झाल्यास नगर विकास संघर्ष समिति तर्फे आंदोलन करण्याचा इशारा खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, श्याम चौधरी यांनी दीला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नगर विकास समिती मोहाडी यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here