नेरळ ग्रामपंचायतकडून कामगारांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

नेरळ ग्रामपंचायतकडून कामगारांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

नेरळ ग्रामपंचायतकडून कामगारांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

✒️संदेश साळुंके
नेरळ कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

नेरळ :- नेरळ ग्रामपंचायत मधील कामगारांनी आपल्या थकीत पगारासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि मार्च अखेर असल्याने कर वसुली करण्यासाठी कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे.ग्रामपंचायत पुढील दर महिन्याला दोन पगार देण्याचे शब्द नेरळ ग्रामपंचायत कडून देण्यात आले आहे. दरम्यान,ग्रामस्थांनी सहकार्य करून वार्षिक कर वसुली देण्यात यावी असे आवाहन ग्रामपंचायत कडून करणेत आले आहे.

नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत पगारासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.सलग तीन दिवस सफाई,वीज आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या विषयांवर तोडगा निघावा यासाठी आज नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला सरपंच उषा पारधी,उप सरपंच मंगेश म्हसकर, ग्रामविकास अधिकारी अरुण कारले,ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे,उमा खडे, गीतांजली देशमुख,जयश्री मानकामे, शिवाली पोतदार आणि संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.ग्रामपंचायत ने आपली भूमिका मांडताना नेरळ ग्रामपंचायत मध्ये 105 कामगार असून त्यातील एक मयत असल्याने सध्या 104 कामगार कार्यरत आहेत.कामगार सांगत आहेत,त्याप्रमाणे परिस्थिती नाही कारण कामगारांचे सलग नऊ महिन्यांचे पगार थकले आहेत. मात्र ते थकीत पगार हे 2018 पासूनचे असून त्यात 2018ते 2021 या काळात दिवंगत सरपंच रावजी शिंगवा यांच्या कार्यकाळात चार पगार थकीत राहिले आहेत.त्यातील दोन पगार प्रभारी सरपंच यांच्या काळात देण्यात आली आहेत.त्यामुळे जुने चार आणि आताचे पाच असे नऊ महिन्यांचे पगार थकीत आहेत. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या तीन महिन्यांचे पगार सलग देण्यात आले आहेत.उषा पारधी सरपंच झाल्यापासून 33 महिन्यात 28 पगार दिले आहेत.त्यामुळे आता नऊ महिन्यांचे पगार थकीत आहेत अशी माहिती उप सरपंच मंगेश म्हसकर यांनी दिली.कामगारांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्ते यांच्यापैकी मे 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत कर्जाचे हप्ते बाकी आहेत.तर भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही कर्मचारी सांगतील त्याप्रमाणे कापून ती त्यांच्या अकाऊंट मध्ये पोस्ट खात्यात भरली जात आहे.
दुसरीकडे नेरळ ग्रामपंचायत कडून सात वर्षांनी घरपट्टी वाढ झाल्यावर ऑक्टोबर 2023 मध्ये हरकती आल्या. त्यामुळे घरपट्टी वसुली थांबवली गेली आणि घरपट्टी वसुली चार महिने पूर्णपणे बंद होती.त्यानंतर ग्रामसभेची मंजुरी घेवून घरपट्टी वसुलीला सुरुवात झाली असून ग्रामपंचायत ने डिसेंबर,जानेवारी, फेब्रुवारी असे तीन महिने त्या त्या महिन्यांचे नियमित वेतन केले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसह नेरळ ग्रामपंचायत यांचे हित लक्षात घेवून आपले कामबंद आंदोलन स्थगित करून कर वसुली साठी प्राधान्य द्यावे असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतने केले.त्याचवेळी ग्रामपंचायती एकूण महसुली पैकी 35 टक्के खर्च प्रशासनावर व्हावा असे निर्देश असताना प्रत्यक्ष कामगारांच्या पगारावर तब्बल 72 टक्के कामगार वेतन यावर होत आहे आणि त्यामुले ग्रामपंचायत कडे निधी शिल्लक राहत नाही.मात्र अत्यावश्यक सेवा कायम राहावी यासाठी तरतूद ठेवून आम्ही त्या सर्व कामगारांना या महिन्यात दोन पगारे देण्याचे आश्वासन दिले आहे.मात्र हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असल्याने शासनाने नेरळ ग्रामपंचायती चे नेरळ नगरपरिषद रूपांतर करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here