घरकुल लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात बाळु उपलब्ध करावी. उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

घरकुल लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात बाळु उपलब्ध करावी. उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

घरकुल लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात बाळु उपलब्ध करावी.

उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

घरकुल लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात बाळु उपलब्ध करावी. उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

दि. १२ मार्च
चंद्रपूर जिल्हयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री मोदी घरकुल योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना, व रमाई घरकुल योजनेत मोठया प्रमाणात घरकुल मंजुर झालेले आहे. ब-याचशा लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले मात्र रेती अभावी बांधकाम अर्धवट आहेत. तसेच काही लाभार्थ्यांनी वाळू अभावी बांधकाम सुरू केलेले नाही. वाळु घाटाचे लिलाव पूर्णपणे न झाल्याने जिल्हयात वाळु टंचाई आहे. जिथे वाळू घाटाचे लिलाव झाले त्या ठिकाणी लांब अंतरावर असल्याने वाळु आणने अशक्य होत आहे. अशा स्थितीत बाळु पुरवठा करणा-यांकडुन लाभार्थ्यांची आर्थीक पिळवणूक होत आहे. आधीच सिमेंट, लोखंड, इतर साहीत्य मजुरीच्या दरात वाढ झाल्याने सध्याच्या अनुदानात घरकुल बांधने परवडणारे नाही. अश्यातच वाळु टंचाई असल्याने घरकुल लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. तेव्हा सदर गंभीर बाब लक्षात घेऊन घरकुल लाभार्थ्यांना शासकीय व सवलतीच्या दरात वाळु उपलब्ध करून देण्याची मागणी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी आदिवासी नेते तथा पंचायत राज अभ्यासक बापुराव जी मडावी, सामाजिक कार्यकर्ता शंकरराव सानेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.