अंगणवाडी सेविका,मदतनीसांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार–नामदार अदिती तटकरे.
–किशोर पितळे- तळा तालुका प्रतिनिधी ९०२८५५८५२९
तळा- महीला व बालकल्याण विभाग आयोजीत साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समीती कार्यालयात डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात १४मार्च२४रोजी आयोजीत करण्यात आले होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि जिल्ह्यातील ३० हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार असून सोयी सुविधा युक्त अत्याधुनिक पध्दतीची केली जाणार असुन संगणक देखील दिले जाणार आहे.त्याबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पेन्शन सुरू करण्याचा प्रस्ताव आला असून लवकरच मंत्रिमंडळाची मंजूरी मिळेल.तसेच आज तालुक्यातील ३० अंगणवाडी स्मार्ट केल्या जातील.अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करताना निश्चीत च आनंद होत असून सेविका व मदतनीसांना सक्षम करणारं असल्याचे प्रतिपादन केले.त्यापुढे म्हणाल्या कि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मोफत आरोग्य तपासणी डाॅ. आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी केंद्र यांचे मार्फत विभागाकडून करण्यात येणार असुन त्यांच्या कुटुंबियांची देखील केली जाणार आसल्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेत असल्याचे यावेळी सांगीतले.तसेच २०२४पासून जन्म झालेल्या मुलांच्या पुढे पहिले आईचे नाव पुढे वडिलांचे नांव नंतर आडनांव लावण्याचा महत्वपुर्ण निर्णयाला मंजूरी दिल्याचे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे या पुढे असेच लागले जाईल.महीला संबधीचे आठ महत्व पुर्ण निर्णय घेऊन सक्षम बनवीण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी लेकलाडकी योजनेचा पहिला हप्ता धनादेश वाटप,अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट, तसेच महिला बचत गटांना साहित्य वाटप,बेबी किट,मुलांचे खेळण्याचे साहित्य वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अंत्योदय कार्ड,व दारिद्ररेषे खालील शिधा पत्रिका धारकांना मोफत साडी वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर जिल्हा एकात्मिक कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक मॅडम तहसीलदार स्वाती पाटील नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तालुका अध्यक्ष नानाभौड महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे बि.डीओ.सुहास जठार ऍड.उत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळीतालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस,लाभार्थी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते.