म्हसळा येथे नामदार आदितीताई तटकरे यांनी घेतला जल जिवन मिशन कामाचा आढावा.
हर घर नल.. हर घर जल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी योजना
एखादे काम निष्कृष्ठ दर्जाचे झाले तर त्या कामाची जबाबदारी घेणार का.. भाजप जिल्हा युवा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर यांचा सवाल..
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:दि.१४ मार्च रोजी नामदार आदितीताई तटकरे यांनी म्हसळा पंचायत समिती मध्ये जल जिवन मिशन आढावा बैठक अधिकारी व ठेकेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. म्हसळा तालुक्यात ८४ गावामधुन ६०℅ गावात योजनेचे काम चालू असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल.. हर घर जल या महत्वकांक्षी योजनेतील प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्याचा संकल्प केला असता म्हसळा तालुक्यात करोडो रुपये प्रत्येक गावाला दिले असताना एका एका ठेकेदाराला १० ते १५ कामे देऊन अधिकारीच ठेकेदार बनल्याचे निलेश मांदाडकर यांनी नामदार आदितीताई तटकरे यांच्या लक्षात आणून दिले, महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे या विद्यमान मंत्री महोदय आहेत तालुक्यातील प्रत्येक गावातील कामाचे श्रेय जरूर घ्यावे पण एखादी योजना निष्कृष्ठ दर्जाची झाली असेल तर त्याची जबाबदारी देखील मंत्री महोदय हे घेतील का असा सवाल खरसई गावचे माजी सरपंच तथा भाजप रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक वेळा संबंधित अधिकारी यांना गावातील कामासंदर्भात विचारणा केली असता लेखी किंवा तोंडी उडवा उडविची उत्तर दिल्याचे निलेश मांदाडकर यांनी सांगितले, आढावा घेताना ज्या ग्रामपंचायत मध्ये काम सुरू आहेत तेथील ग्रामस्थांना अंधारात ठेवून फक्त जल जिवन मिशनचे ठेकेदार, सब ठेकेदार, अधिकारीच उपस्थित असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरीकांन मध्ये एकच चर्चेचा विषय बनला आहे, या आढावा बैठकीत प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार समीर घारे, पाणीपुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, तालुका अभियंता फुलपगारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, महिला अध्यक्ष सोनल घोले, सकलप माजी सरपंच वनिता खोत, भाजप जिल्हा युवा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर, तसेच सर्व ठेकेदार, पदाधिकारी, अधिकारी वर्ग , सरपंच, व कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————
शासन आपल्या दारी या कार्यक्रमात तालुक्यात जल जिवन मिशन योजनेच्या कामात तफावत आहे व याची सखोल चौकशी व्हावी या संदर्भात मंत्री महोदय यांना सर्व पक्षीय लेखी निवेदन देखील देण्यात आले होते. तालुक्यात एका ठेकेदाराला किती कामे मिळाल्याची माहिती जनतेपर्यंत कळावी व जल जिवन मिशनचे कामाचे ऑडिट थर्ड पार्टी ने व्हावी भाजप रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर यांची प्रामुख्याने मागणी .
—————————————
निष्कृष्ठ दर्जाच्या कामाचा पाढा वाचून दाखविला असता ठेकेदार यांचा कामाचा ठेका रद्द करून तात्काळ फेर निविदा काढण्यात याव्यात या प्रकारे सुचना व आदेश पाणीपुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे यांना मंत्री महोदय आदिती ताई तटकरे यांनी दिल्या.