निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना न्याय देण्यासाठी
आमदार जोरगेवार यांना मिळाली नवी जबाबदारी 👇👇
♦️धर्मदाय रुग्णालयातील 10 टक्के खाटा राहणार गरीब – गरजू रुग्णांसाठी आरक्षित
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 15 मार्च
गरजु रुग्णांवर उपचार करण्यासाठी धर्मदाय रुग्णालयात 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरक्षित खाट निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समीतीवर आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार होण्यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वीत खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयासह धर्मादाय रुग्णालयातही गरजू रुग्णांवर निशुल्क उपचार होणार आहे.