आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:दि.१५मार्च रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या स्वप्नल फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा कृषिरत्न पुरस्कार मांदाटणे ग्रामपंचायत चे आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना जाहीर होऊन स्वप्नल फाऊंडेशनचे प्रमुख अध्यक्ष शोभाताई बल्लाळ व तसेच कृषी बाजार समिती पुणे अध्यक्ष राजाराम धोंडकर तसेच सिने अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे यांच्या शुभ हस्ते आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले,पुरस्कार स्वीकारताना सौ पवार देखील उपस्थित होत्या,या वेळी बोलताना चंद्रकांत पवार यांनी सांगितले की माझे शिक्षण पूर्ण करून मी नोकरीच्या शोधात न राहता काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने मी शेती कडे वळलो, नवनवीन प्रयोग केले शेतीविषयक मार्गदर्शन घेतले, तज्ञाचा सल्ला घेतला, शेतीविषयक आधुनिक पध्दतीने मी भाजी, आंबा, काजू, कलिंगड अशा प्रकारे लागवड करून मला चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ लागले, तसेच गावचा सरपंच या नात्याने मी गावामधील जनतेला देखील शेतीविषयक महत्त्व पटवून रोजगार उपलब्ध करून दिले आहेत, आणि तरुणांना देखील सांगणे आहे नोकरीच्या शोधात न राहता आधुनिक शेती करा. चंद्रकांत पवार यांना स्वप्नल फाऊंडेशन च्या वतीने कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याने आणखी एक मानाचा तुरा मिळाल्याने पवार यांनी समाधान व्यक्त केले, या वेळी स्वप्नल फाउंडेशन अध्यक्ष शोभाताई बल्लाळ,कृषी बाजार समिती पुणे अध्यक्ष राजाराम धोंडकर,सिने अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे ,तसेच फाऊंडेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तिथ होते.