तळा तहसीलला कार्यालयीन कामकाजासाठी वाहन सेवेत सज्ज.
पालकमंत्री या.उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
किशोर पितळे-तळा तालुका प्रतीनिधी ९०२८५५८५२९
तळा-रायगड जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रायगड जिल्हा महसूल विभागाकरिता २२ नवीन गाड्या देण्यात आल्या काल १६मार्च रोजी या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार मा. उदयजी सामंत साहेब व मा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. महसूल विभागातील वाहनांची अवस्था ही अतिशय दयनीय झाल्याने अपघात परिस्थिती निर्माण झाली होती.काही कार्यालयांना कित्येक वर्षे वाहने नव्हती. त्यात तळा तहसील मध्ये जवळपास १०वर्ष गाडी ना दुरुस्त होती.अनेक वेळा खर्च करुनही पार्ट मिळत नव्हते.भंगार झाली होती.याची सतत मागणीहोतहोती. कामासाठी पं.समीती किंवा खाजगी वाहने भाड्याने घेऊन जिल्ह्यात किंवा इतर कार्यालयीन कामासाठी जावे लागत होते.याचा परिणाम कामकाजावर होत असे.याचा वरिष्ठांनी लक्षात घेऊन जिल्हा नियोजनाने निधीची तरतूद करुन गाड्या खरेदीकेल्या.जिल्ह्यातील २२ महसुल कार्यालयातील जनसामान्यांची कामे करण्याचा वेग वाढवण्यासाठी नवीन वाहनांची महसूल खात्याला गरज होती.या वाहनांमुळे महसूलविभागाला कार्यक्षमतेने आपले कर्तव्य पार पाडता येईल अशी अपेक्षा याप्रसंगी मा.आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केली.तळा तहसील मध्ये वाहन सेवेला दाखल झाली असून तहसीलदार श्रीम.स्वाती पाटील नायब तहसीलदार मंगेश पालांडे.व कर्मचारी यांनी गाडीचे विधीवत पुजा करून स्वागत केले.