नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून श्री वसंतराव चव्हाण नाम है काफी..
अशोक वाघमारे
नांदेड प्रतिनिधी
नांदेड:नांदेड लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नायगावकरांचे नाव हे सर्वस्वी असल्याचे संबंध जिल्ह्यातील गोरगरीब व सामान्य मतदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे श्री वसंतराव चव्हाण यांना जिल्ह्यातील राजकारणाचा तगडा अनुभव आहे व जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने ते विकास कामाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये परिचित असून त्यांनी अतिशय चांगले काम केले असल्याने त्यांची गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला जाण असल्याचे सांगण्यात येत आहे श्री वसंतराव चव्हाण हे या निवडणुकीत त्यांचा राजकीय हिसका मात्र निवडणुकीच्या माध्यमातून दाखवणार हे मात्र निश्चित.
श्री वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास तसा नायगाव येथील ग्रामपंचायत पासून सुरू झाला ते पहिल्यांदा राजकीय पाऊल हे सरपंच पदापासून ते पुढे जिल्हा परिषद सदस्य विधान परिषद सदस्य त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विधानसभा सदस्य तर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विधानसभा सदस्य तर पुढे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक असा त्यांचा राजकीय प्रवास असून या राजकीय प्रवाशामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असल्याने नांदेड लोकसभा मधून श्री वसंतराव चव्हाण यांचे नाव मात्र आघाडीवर असल्याचे अधिकृत सूत्राकडून सांगण्यात आले आहे. श्री वसंतराव चव्हाण हे विकास कामाचे दाते व गोरगरिबांचे कैवारी म्हणून सबंध जिल्ह्यामध्ये सुप्रचित आहेत म्हणून जिल्ह्यातील मतदारांच्या विश्वासार्ता म्हणून व निष्कलंकित अशी ओळख त्यांची जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने श्री वसंतराव चव्हाण यांच्या एकाच नावाची दिल्ली हाय कमांड कडे उमेदवारांची शिफारस केली आहे त्यामुळे दिल्ली हाय कमांड यांच्याकडून ग्रीन सिग्नल श्री वसंतराव चव्हाण यांना जर मिळाला तर ते निश्चितपणे ताकतीने निवडणूक लढणार असे ठामपणे श्री वसंतराव चव्हाण यांच्याकडून माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला श्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे व काही नेते आणि कार्यकर्ते भाजपमय झाल्याने काँग्रेसला धक्का बसला तरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस विचारी मतदार हे जागृत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस वर्ग हे मात्र जिथल्या तिथे आहे त्यामुळे काँग्रेसला निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये यश मिळू शकतो असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. श्री अशोकराव यांच्यामुळे नांदेड भाजपला अच्छे दिन आले असले तरी यात मात्र महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने श्री वसंतराव चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन त्यांना नांदेडचे मुख्य समन्वयक पदी निवड केली आहे. त्यामुळे श्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठ्या जोमाने व ताकतीनेशी उभारी घेऊन आगामी निवडणुकित मोठी गगन भरारी घेईल असा विश्वास देखील काँग्रेस नेत्यांना असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील असंख्य नेतेमंडळी हे अजूनही काँग्रेसबरोबरच आहेत आणि ते राहणार म्हणून येणारी लोकसभा निवडणूक ही सहजपणे काँग्रेस पक्षाला जिंकता येऊ शकतो याचे कारण असे की, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे अनेक दशकापासून आहे. स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसने जिल्ह्याच्या विकास कामात मोठे योगदान दिलेले आहे. विशेषता जिल्ह्यातील मतदार हे काँग्रेसच्या बाजूने असल्याने श्री वसंतराव चव्हाण यांचे विकास कामाची पद्धत चांगली आहे व त्यांचा स्वभाव शांत, संयमी नेतृत्व असल्याने काँग्रेसकडून श्री वसंतराव चव्हाण यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. श्री वसंतराव चव्हाण यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत गोरगरिबांच्या अडीअडचणीत मदत सामाजिक उपकरणे यातून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय झाले.
नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करणार आणि हा गड कायम काँग्रेसचाच राहणार असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना असल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात मूळ काँग्रेस निष्ठावंत यांची संख्या लाखो मध्ये असल्याने यात काँग्रेस उमेदवाराला निश्चित फायदा होऊ शकतो प्रामुख्याने मुदखेड, भोकर, बिलोली, देगलूर, हदगाव,हिमायतनगर, नांदेड दक्षिण,आणि नायगाव, उमरी,धर्माबाद,नांदेड उत्तर, मुखेड, या ठिकाणी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य असल्याने येथून काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील राजकारण हे अतिशय खालच्या पातळीवर गेले असून गेल्या दहा वर्षापासून देशामध्ये सूडांचे राजकारण चालू आहे. आणि देशांमध्ये खोटे आश्वासन देऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून देशातील शेतकरी बेरोजगार छोटे व्यावसायिक मजूर वाहनधारक व इतरांच्या मनात तीव्र नाराजी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसेल आणि श्री राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्ष पुन्हा नव्या जोमाने देशांमध्ये सत्ता परिवर्तन करून देशातील सत्ता काबीज करेल. म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून श्री राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन व गोरगरीब शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व नोकर भरती यांचे समस्या समजावून देशामध्ये काँग्रेस प्रणित सरकार येईल व देशाला काँग्रेसच न्याय देऊ शकतो असा विश्वास नांदेड येथील मतदारांना असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री वसंतरावजी चव्हाण यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या असंख्य भेटी यात श्री जी के वाघमारे (सेवानिवृत्त तलाठी ), धर्माबाद नगरपंचायत चे माजी शिक्षण सभापती श्री राजेश मनुरे, सामाजिक कार्यकर्ते श्री डी के वाघमारे उपस्थित होते
म्हणून नांदेड लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची असणारी निवडणूक ही ही निवडणूक आहे एकीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी रंगत होणार हे निवडणूक ताकदीदींशी लढवून ते जिंकणारच असा विश्वास नांदेड काँग्रेसने त्यांना असल्याचे दिसून येत आहे. “हम लढेंगे और जितेंगे “……….