केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, या लोकसभा निवडणुकीत घरबसल्या मतदान करता येणार तुमसर -मोहाडी विधानसभेत १८८१ वयोवृद्ध तर दिव्यांगांची संख्या २४३५ उपविभागीय अधिकारी दर्शन नीकाळजे यांची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, या लोकसभा निवडणुकीत घरबसल्या मतदान करता येणार

तुमसर -मोहाडी विधानसभेत १८८१ वयोवृद्ध तर दिव्यांगांची संख्या २४३५

उपविभागीय अधिकारी दर्शन नीकाळजे यांची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, या लोकसभा निवडणुकीत घरबसल्या मतदान करता येणार तुमसर -मोहाडी विधानसभेत १८८१ वयोवृद्ध तर दिव्यांगांची संख्या २४३५ उपविभागीय अधिकारी दर्शन नीकाळजे यांची माहिती

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असून त्याकरिता निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. तुमसर -मोहाडी विधानसभेत ८५ वर्षांवरील एकूण मतदारांची संख्या १८८१ असून दिव्यांग मतदारांची संख्या २४३५ आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना घरूनच यावेळी मतदान करता येणार आहे अशी घोषणा केली आहे. त्याकरिता त्यांना १२ डी हा फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच ज्या दिव्यांगाजवळ ४० टक्के दिव्यांग असले प्रमाणपत्र असेल त्यांना घरूनच मतदान करता येणार आहे. याकरिता स्थानिक निवडणूक आयोगाचे बी. एल. ओ. घरोघरी जाणार आहेत. तसेच त्यांना पोस्टल बॅलेट हे देणार आहेत.

लोकशाहीचा गर्व, मतदानाचे पर्व असे ब्रीदवाक्य निवडणूक आयोगाचे असून सर्वांनी या मतदान पर्वात सहभागी व्हावे. याकरिता मतदारांच्या घरापर्यंत प्रथमच मत निवडणूक आयोगाचे नियुक्त केलेले अधिकारी जाणार आहेत. यात ८३ वर्ष पूर्ण केलेल्या व त्यापुढील वयोवृद्धांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग यांचे करता येईल ही सोय निवडणूक आयोगाने केली आहे. याकरिता घरोघरी बीएलओ हे कर्मचारी व अधिकारी जातील तसेच या सर्वांचे पोस्टल बॅलेट हे राहणार आहे. येथे एकदा फॉर्म भरला तर त्या मतदारांना केंद्रात जाता येणार नाही. ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

तुमसर-मोहाडी विधानसभेत ३४८ एकूण मतदान केंद्र आहेत. तुमसर तहसील कार्यालयातच सर्व ईव्हिएम मशीन ठेवण्याकरिता स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली. त्यात ए. बी. सी. डी. अशी ईव्हीएम मशीन प्रकारानुसार ठेवण्यात येणार आहेत. यावेळी मतदान केंद्रात वेबकास्टिंग होणार आहे. ५० टक्के वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे. त्यात १७४ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग ची सुविधा राहणार आहे. यापूर्वी २० टक्के मतदान केंद्रात वेबकास्टिंग केली जात होती. यावेळी ती ५० टक्के मतदान केंद्रावर राहणार आहे.

तुमसर शहरातील हिंदी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र हे यावेळी शारदा कन्या विद्यालयात राहणार आहे. आचारसंहिता लागू होताच जाहिरातीची पोस्टर्स होर्डिंग्ज शहर व तालुक्यात तात्काळ हटविण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी दिले आहेत. पत्र परिषदेला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार मोहन टिकले, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार बी.एस. पेंदाम यांनी निवडणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here