पंचायत समीती शिक्षण विभाग वतीने  निपुण उत्सव साजरा.

पंचायत समीती शिक्षण विभाग वतीने  निपुण उत्सव साजरा.

पंचायत समीती शिक्षण विभाग वतीने  निपुण उत्सव साजरा.

पंचायत समीती शिक्षण विभाग वतीने  निपुण उत्सव साजरा.

:किशोर पितळे:तळा तालुका प्रतिनीधी९०२८५५८५२९

तळा :- तळा निपुण भारतअभियानांतर्गत निपुण महोत्सव तालुकास्तरावर आयोजीत करण्याचे रायगड जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे तळा पंचायत समिती शिक्षण विभागाने १९मार्च२४रोजी कन्या शाळा तळा चे सभागृहात आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक केंद्रातून निपुण भारत अंतर्गत भाषा,गणित,शैक्षणीक साहित्य तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम सादरीकरण करणे तसेच शिक्षकांसाठी निंबध स्पर्धाचे आयोजन करुन १)माझी निपुण शाळा २)असे आम्ही निपुण झालो हे निंबधाचे विषय होते.या निपुण भारत अभियानांतर्गत उपक्रमातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी  शिक्षण घेऊन किती निपुण झाले. व शिक्षकाची शिक्षणातून केलेली प्रगती हा यामागील हेतू होता. यावेळी तालुक्यातील केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थीनी सहभाग घेऊन निपुण उत्सव साजरा केला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी  निपुण उत्सव राबवण्याची शासनाच्या आदेशाप्रमाणे तालुकास्तरीय साजरा करीत आहोत सर्व शाळाची रंगरंगोटी,स्वच्छता, क्रिडा साहित्य,शालेय पोषण आहार नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबवून विद्यार्थांची बौधिक क्षमता वाढण्यास मदत होते.यामधूनच विद्यार्थी निपूण (प्रगती)किती झाला आहे हे निदर्शनात येते. शिक्षकांना निबंधाच्या विषयातून व शैक्षणीक साहित्य निर्मीतीचे प्रगतीमधून  निबंध स्पर्धा घेऊन सौ.मितल सुहास वावेकर प्रथम,भुषण गंगाधर जाधव द्वितीय,चेतन नारायण जगताप तृतीय क्रमांक प्राप्त झाले तर शैक्षणीक साहित्य निर्मीती स्पर्धेत भाऊसाहेब शेकू पवार प्रथम,पुनम विजय खैरनार द्वितीय,मितल सुहास वावेकर तृतीय क्रमांक प्राप्त झाले.त्याचे प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम, विस्तार अधिकारी दिपक ठाकूर,विषय साधन व्यक्ती सचिन म्हात्रे सचीन खंडागळे, केंद्रप्रमुख गौतम मनवर सर,सुधीर जाधव लियाकत राऊत उपस्थीत होते.
परीक्षक आंबेगावे सर व नितीन पाटील सर होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रप्रमुख लियाकत राऊत सर यांनी केले.