काळ जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार वरदान आ. भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे १६६० कोटी रुपये मंजूर

काळ जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार वरदान आ. भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे १६६० कोटी रुपये मंजूर

काळ जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार वरदान
आ. भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे १६६० कोटी रुपये मंजूर

काळ जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार वरदान आ. भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे १६६० कोटी रुपये मंजूर

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगाव तालुक्यातील केळगण – कुंभे येथील काळ जलविद्युत प्रकल्पासाठी आमदार भरत शेठ गोगावले यांनी पुढाकार घेऊन पुनर्वसन आणि कामाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळवून १,६६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्या बद्दल माणगाव आणि महाड तालुक्यातील तमाम शेतकरी आणि ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरीस्टर ए.आर. अंतुले यांनी १९८१ मध्ये कुंभे जलविद्युत प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पाला २०० कोटी निधी मंजूर करून हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र निधी अभावी हा प्रकल्प अपूर्ण राहिला होता. दरम्यान या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांचे माणगाव येथील भादाव गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने या धरणाचे पाणी माणगाव आणि महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे दुबार शेती करता येत नव्हती. तसेच प्रकल्प सुरू झाला नसल्याने वीज तयार होत नव्हती. त्यामुळे माणगाव आणि महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

या पार्श्वभूमीवर येथील पत्रकार आणि शेतकरी यांनी वारंवार निवेदने देऊन आवाज उठवला होता. परंतु तत्कालीन मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी या महत्वाच्या प्रकल्पात लक्ष न देता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर माणगाव तालुक्यातील निजामपूर, गांगवली, लोणेरे विभाग तर महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली असती. त्यामुळे शेतकरी खर्या अर्थाने सुखी आणि समाधानी झाला असता. तसेच हा परीसर सुजलाम सुफलाम होऊन शेतकऱ्यांनी विविध प्रकारची पिके, भाजी पाला, बागायती शेती करुन त्याच्या हातात उत्पादन आणि उत्पन्न मिळाले असते.

मात्र आज तब्बल ४४ वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकर्यांचे गार्हाणे ऐकून माणगाव आणि महाड तालुक्यांचा कायापालट करणाऱ्या आणि चेहरा मोहरा बदलणार्या आणि या प्रकल्पाला ऊर्जितावस्था आणून देणार्या शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले येथील शेतकरी केवळ निवडणूकीतच नव्हे तर त्यांच्या सोबत कायमस्वरूपी राहतील असा आत्मविश्वास सर्वांना वाटत आहे. हा कुंभे जलविद्युत प्रकल्प अत्यंत महत्वकांक्षी असून याचे दुरगामी चांगले परिणाम आमदार भरत शेठ गोगावले यांच्या राजकीय कारकीर्दीला निश्चितच लाभदायक ठरेल यात तिळमात्र शंका नाही.