जाणता राजा प्रतिष्ठान भाले तर्फे शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन. माणगांव च्या “भाले ” गावात कोल्हापुरच्या शाहीर समशेर रंगराव पाटील यांच्या प्रसिद्ध “शिवशाही ते लोकशाही” कार्यक्रमाची २८ रोजी विशेष पर्वणी

जाणता राजा प्रतिष्ठान भाले तर्फे शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन. माणगांव च्या "भाले " गावात कोल्हापुरच्या शाहीर समशेर रंगराव पाटील यांच्या प्रसिद्ध "शिवशाही ते लोकशाही" कार्यक्रमाची २८ रोजी विशेष पर्वणी

जाणता राजा प्रतिष्ठान भाले तर्फे शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन.

माणगांव च्या “भाले ” गावात कोल्हापुरच्या शाहीर समशेर रंगराव पाटील यांच्या प्रसिद्ध “शिवशाही ते लोकशाही” कार्यक्रमाची २८ रोजी विशेष पर्वणी

जाणता राजा प्रतिष्ठान भाले तर्फे शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन. माणगांव च्या "भाले " गावात कोल्हापुरच्या शाहीर समशेर रंगराव पाटील यांच्या प्रसिद्ध "शिवशाही ते लोकशाही" कार्यक्रमाची २८ रोजी विशेष पर्वणी

✍️राम भोस्तेकर ✍️
महाड तालुका प्रतिनिधी
📞9273701068📞

महाड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांची तिथी प्रमाणे शिवजयंती महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात मोठया उत्साहात साजरी होत असते.त्याचप्रमाणे माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागात असणाऱ्या “भाले” या शिवकालीन गावात ,शिवकालीन असे का? तर शिवकाळात या गावात मावळ्यांच्या लढाईचे “भाले” बनत असत या इतिहास दप्तरी असलेल्या नोंदी मुळे या गावाचे नाव भाले असे रूढ झाले आहे.या गावात गेली १० वर्षाची परंपरा जाणता राजा प्रतिष्ठा न भाले गावचा असलेला शिवजयंती महोत्सव २०२४ यावर्षी २८ मार्च रोजी संपन्न होत आहे.या कार्यक्रमात २८ मार्च रोजी दुर्गराज किल्ले रायगड ते भाले असे शिवज्योत आगमन व पुजन तसेच दुपारी ३ वाजल्यापासून गावातुन मिरवणूक तसेच दरवर्षीप्रमाणे विशेष आकर्षण म्हणजे यावर्षी या शिवजयंती जयंती महोत्सवात शाहीर समशेर रंगराव पाटील कोल्हापूर यांचा “शिवशाही ते लोकशाही”ह्या कार्यक्रमात पोवाडा,स्फूर्तीगीते,विनोदी बतावणी यातून इतिहास व वर्तमान यांची सांगड घालणारा रांगडा मराठमोळा याचे आयोजन जाणता राजा प्रतिष्ठान भाले ता.माणगांव यांच्याकडून करण्यात आले आहे.या संपूर्ण कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी सामील व्हावे असे अवाहन जाणता राजा प्रतिष्ठान भाले यांच्याकडून करण्यात आले आहे.