अपघातात एक युवक ठार, दोन जखमी

अपघातात एक युवक ठार, दोन जखमी

अपघातात एक युवक ठार, दोन जखमी

अपघातात एक युवक ठार, दोन जखमी
🖋️ साहिल सैय्यद……
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्गुस :- घुग्घुस येथून जवळच असलेल्या उसगावचा एक युवक अपघातात ठार झाला तर दोन युवक गंभीर जखमी आहे.
मंगळवार, १९ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास मनोज मोहनदास राजूरकर, वैभव मंगल उकीनकर, स्वप्नील सुरेश ठाकरे हे दुचाकीने घुग्घुस येथून उसगावकडे परत जात असतांना परिसरात मुसळधार पाऊस पडत होता उसगाव वळण रस्त्यावर दुचाकी व स्कुलबसचा अपघात झाला अपघातात मनोज मोहनदास राजूरकर या युवकाचा मृत्यू झाला तर वैभव मंगल उकीनकर व स्वप्नील सुरेश ठाकरे हे दोन युवक गंभीर जखमी झाले.
याबाबत कळताच नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात जखमी युवकांना रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.

परिसरात दुपारच्या सुमारास वादळ वाऱ्या सह मुसळधार पाऊस आला उसगाव येथील तीन युवक कामानिमित्त घुग्घुस येथे आले होते एका दुचाकीने तिन्ही युवक घुग्घुस येथून उसगावकडे परत जात असतांना उसगावच्या वळण रस्त्यावर दुचाकीचा व स्कुलबसचा अपघात झाला.